Local Body Elections : चिखलीत काँग्रेस–वंचित युती कोसळली!

Congress–Vanchit alliance collapses in Chikhli : बाळासाहेब भिसे रणांगणात कायम, ‘काँग्रेसने विश्वासघात केला’

Chikhli चिखली नगरपरिषद निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीची युती अखेर अवघ्या सात दिवसांतच कोसळली आहे. वंचितचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी काँग्रेसवर तीव्र आरोपांचा पाऊस पाडत नगराध्यक्षपदाची उमेदवारी कायम ठेवली आहे. “काँग्रेसने आमच्याशी शेवटपर्यंत चर्चा करूनही जागा न देता सरळ विश्वासघात केला,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

१४ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ‘काँग्रेस–वंचित’ युती जाहीर केली होती. या घोषणेने राज्यात मोठी चर्चा निर्माण झाली होती. मात्र अवघ्या ७ दिवसांतच ही युती चिखलीत पूर्णपणे तुटली.

Local Body Elections : वंचितच्या उमेदवाराची माघार; शिवसेनेला मोठा दिलासा!

बाळासाहेब भिसे म्हणाले, “धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही काँग्रेससोबत आलो.” “शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला झुलवत ठेवले.” “शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला काँग्रेसने जागा दिल्या; पण वंचितला एकही जागा नाही.” “नगराध्यक्ष पदाची मागणीही आम्ही केली नव्हती—फक्त आमची ताकद असलेल्या प्रभागांत जागांची अपेक्षा होती.”

“बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून राजकारण करणे हा बोंद्रे घराण्याचा उद्योग आहे. दलित–बहुजनांच्या मतांचा फक्त उपयोग करून शेवटी आम्हालाच डावलले जाते. यंदा आम्ही गप्प बसणार नाही.”

Farmer ID : आपत्तीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटींची मदत जमा

वंचित कार्यकर्त्यांत संतापाची लाट— “जागा न देणाऱ्या काँग्रेसला मतदानातून उत्तर देऊ,” अशी भूमिका अनेकांनी सार्वजनिकपणे मांडली आहे. दोघेही तिकीटासाठी स्पर्धेत होते. यातील नाराजी आवरण्यासाठी काँग्रेसने वंचितसोबत आघाडीचा “दिखावा“ केल्याचा आरोप भिसेंनी केला आहे. शेवटी काँग्रेसने काशिनाथ बोंद्रे यांना उमेदवारी दिली, आणि गावंडे यांनी तत्काळ राष्ट्रवादी (अजित पवार गट)–शिंदेसेना आघाडी गाठली.