Local Body Elections : चिखलदऱ्यात फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध !

Devendra Fadnavis’ brother Alhad Kaloti wins unopposed in Chikhaldara : आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांना यश, काँग्रेस उमेदवारांसह ११ जणांचा माघार घेतल्याने मार्ग मोकळा

Chilkhaldara – Amravati : चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत आज (२० नोव्हेंबर) मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे आमदार रवी राणा यांच्या सक्रीय प्रयत्नांमुळे अखेर बिनविरोध निवडून आले. या निकालामुळे भाजप–राणा गटाला मोठे राजकीय यश मिळाले असून चिखलदरा परिसरात या घडामोडीची मोठी चर्चा होत आहे.

या निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात उतरलेले शेख इर्शाद शेख जमील तसेच नथ्थू खडके, नामदेव खडके यांच्यासह एकूण ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या माघारीनंतर आल्हाद कलोती यांच्यासमोर कोणताही प्रतिस्पर्धी उरला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चासत्रे, समन्वय व मतदारांना न दुखावता होणाऱ्या प्रयत्नांना वेग आला होता. या सर्व प्रक्रियेचा परिपाक आज उमेदवारांच्या एकत्रित माघारीत दिसून आला.

Pune land scam : पार्थ पवारांच्या कंपनीचे व्यवहार अधिकच संशयास्पद !

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा..
अल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. रवी राणा यांनी उपस्थित कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना स्पीकर फोनवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा संवाद थेट ऐकवला, ज्यामुळे कार्यक्रमात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवी राणा यांच्या प्रयत्नांचे, तसेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या समन्वयाचे कौतुक केले.

Local body election : पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणारा नेता कोठडीतूनच निवडणुकीत !

चिखलदरा नगरपरिषदेत नवीन समीकरणे..
आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड ही आगामी काळातील चिखलदरा नगरपरिषदेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. रवी राणा यांच्या नेतृत्वात स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे अधिक मजबूत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नगरपरिषदेत आता विकासाचे नवे प्रकल्प, निधी उपलब्धता आणि प्रशासनिक गती वाढण्याबाबत नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
चिखलदऱ्यातील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.