Local Body Elections : सोशल मीडियावर ‘लेडी पॉवर’चा जलवा, तालुक्यात महिलाराजची चाहूल!

‘Lady Power’ Shines on Social Media in Malkapur : नरवेल–धरणगाव गटात हायव्होल्टेज संघर्ष, मलकापूर ग्रामीण–देवधाबा गटात भाजपची अंतर्गत चुरस,

Malkapur : मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, या वेळी राजकीय पटलावर महिलांचा आत्मविश्वास आणि सक्रियता स्पष्ट जाणवू लागली आहे. पारंपरिक पुरुषप्रधान राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आता महिला उमेदवारांच्या नेतृत्वाची नवी पहाट उगवत आहे. नरवेल–धरणगाव, मलकापूर ग्रामीण–देवधाबा आणि दाताळा–उमाळी हे तिन्ही गट सर्वसाधारण महिला आरक्षित ठरल्याने महिलाच या निवडणुकीचे खरे केंद्रबिंदू बनल्या आहेत.

ही निवडणूक केवळ सत्तेची लढाई नाही, तर महिला सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तन आणि आधुनिक राजकीय दृष्टिकोनाचा उत्सव ठरत आहे. महिला उमेदवारांच्या प्रचारशैलीतही नावीन्य दिसत आहे – ‘दरवाज्यावर भेट, मोबाइलवर मैत्री आणि समाजात विश्वास’ या त्रिसूत्रीवर त्या मतदारसंघात सक्रिय आहेत.

Nitin Gadkari : साहेब, पेन्शनचे काम झाले हो, ज्येष्ठाने मानले गडकरींचे आभार

गावोगावी भेटीगाठींसोबतच महिला उमेदवार आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरूनही थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवार डिजिटल प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. यामुळे गावपातळीवर डिजिटल संवादाची नवी संस्कृती तयार होत आहे.

या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या विद्यमान सदस्य मंगलाताई रायपुरे आणि शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांच्या पत्नी कांचन साठे यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. रायपुरे यांचा अनुभव आणि साठे परिवाराचा जनाधार या लढतीला अधिकच रंगत आणत आहे.

येथे भाजपचे विद्यमान सदस्य केदार एकडे यांच्या घरातील महिला तसेच नेते ज्ञानदेव वाघोदे यांच्या पत्नी या दोघींची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. बचतगट, महिला मंडळे आणि शेतकरी महिला यांच्याशी संपर्क वाढवून दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे.

Local Body Elections : ७० टक्क्यांहून अधिक माजी नगरसेवकांचे तिकीट कटणार?

माजी जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे, कोमलताई सचिन तायडे, तसेच भाजपात नव्याने दाखल झालेल्या प्रवीण क्षिरसागर यांच्या पत्नी या तिघी उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. तिघींचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू असून, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नवा डिजिटल ट्रेंड त्यांनी निर्माण केला आहे. सध्या तालुक्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) सक्रिय असून, काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार गट) अजूनही चर्चेच्या टप्प्यात आहेत.