MVA on the Path of Unity; BJP’s focus on Candidate Selection : बुलढाण्यात ‘थेट सामना’, ११ नगरपालिकांपैकी ९० टक्के जागांवर आघाडीचे एकमत
Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष — काँग्रेस, उद्धवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी उमेदवार निवडीत ८५ ते ९० टक्के जागांवर एकमत साधले आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपल्या उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
बुलढाणा शहरात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व ११ नगरपालिकांच्या निवडणूक नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, २८६ नगरसेवक पदांपैकी सुमारे ८५ ते ९० टक्के ठिकाणी उमेदवारीवर एकमत झाले आहे. उर्वरित काही ठिकाणांचा निर्णय वरिष्ठ नेते एकत्र बसून घेणार आहेत.
Teacher’s constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंख्येत चार हजारांवर घट
या बैठकीला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, अॅड. जयश्री शेळके, काँग्रेसचे माजी आमदार राजेश एकडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके आणि प्रसेनजीत पाटील आदींची उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी “महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र लढावे” असा एकमुखी निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्या नगरपालिकांमध्ये मतभेद उरले आहेत, त्या ठिकाणांचा अंतिम निर्णय डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. राहूल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर आणि जालिंधर बुधवत हे नेते संयुक्तरीत्या घेणार आहेत. या जागांची संख्या अत्यल्प असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Buldhana Police : १६३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांना आयकर विभागाच्या नोटीस!
दरम्यान, भाजपकडूनही नगरपालिकांसाठी उमेदवार निश्चितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षनिरीक्षक आ. चैनसुख संचेती यांच्या उपस्थितीत बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्षपद तसेच नगरसेवक पदांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांकडून तीन पसंतीच्या नावांची यादी मागवण्यात आली आहे. ही यादी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार असून अंतिम घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, व्ही. डी. पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








