Local Body Elections : ५९४ पेक्षा अधिक जणांकडे शस्त्र परवाने; ५७ जणांना सूट

Over 594 people hold weapon licenses; 57 granted exemption : बुलढाण्यात ३४९ शस्त्रे पोलिसांत जमा; उर्वरितांना नोटीस, कारवाईची तयारी

Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होताच कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून शस्त्र जमा करण्याची मोहीम वेगाने राबवली जात आहे. जिल्ह्यातील परवानाधारकांकडील ३४९ शस्त्रास्त्रे पोलिस ठाण्यांत जमा झाली आहेत. उर्वरितांकडून शस्त्रे जमा न झाल्याने पोलिस विभागाने नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

निवडणूक कालावधीत शस्त्रे जमा न करणाऱ्यांविरुद्ध भादवि कलम १८८(एच) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तसेच, संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Local Body Elections : निवडणूक लागली अन् पालिकेची तब्बल ६० लाखांची वसुली!

जिल्ह्यात स्वसंरक्षण, व्यवसायिक कारणे तसेच सुरक्षेच्या गरजांच्या आधारे ५९४ पेक्षा जास्त नागरिकांकडे सरकारमान्य शस्त्र परवाने आहेत. यापैकी ५७ जणांना सुरक्षेच्या कारणास्तव सूट देण्यात आली असून त्यात

शेगाव संस्थांची सुरक्षा

बँकांचे सुरक्षा रक्षक

काही महत्त्वाच्या संस्थांचे अधिकृत रक्षक
यांचा समावेश आहे.

परवाना धारकांमध्ये बिल्डर, डॉक्टर, राजकीय नेते आघाडीवर

शस्त्र परवाना घेणाऱ्यांमध्ये
बिल्डर, राजकीय नेते, डॉक्टर, प्रमुख व्यावसायिक आणि उद्योजक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. स्वसंरक्षणासाठी परवाना देताना अर्जदाराची शारीरिक-मानसिक पात्रता, आवश्यकता आणि कायदेशीर कागदपत्रे यांची काटेकोर पडताळणी केली जाते.

Local Body Elections : प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, मैदान मारण्यासाठी आटापीटा

निवडणूक काळातील शस्त्रनियमनाचा राजकीय संदर्भ

निवडणूक काळात उमेदवारांवर दबाव तंत्र, मतदारांना धमक्या, अपहरण, शक्तीप्रदर्शन यांसारख्या प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासन शस्त्र जमा करण्याच्या सूचनांकडे विशेष लक्ष देते. आचारसंहितेच्या अंमलबजावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्व परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश कडकपणे बजावले आहेत.

छाननी समितीचा आढावा

छाननी समितीने विविध परवानाधारकांची तपासणी करून काही वर्गांना सवलत दिली आहे. त्यात—

बँका

ज्वेलर्स

क्रीडापटू

सरकारी संस्था

सुरक्षा एजन्सी
यांचा समावेश आहे.

Local Body Elections : पश्चिम विदर्भातील ४० नगरपरिषद, ५ नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान

प्रशासनाचे आवाहन

“उर्वरित परवानाधारकांनी तातडीने शस्त्रे जमा करावीत, अन्यथा कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही,” असे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.