Paid leave for workers on Voting day : सवलत न देणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा इशारा
Buldhana जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणूक होणाऱ्या क्षेत्रांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. नागरिकांना मतदानाचा हक्क निर्बंधाविना बजावता यावा यासाठी राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या २८ नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार, संबंधित विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल्स आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कामगार व कर्मचारी मतदारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.
Self-Reliance Pulses Mission : केंद्र सरकारचे ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान महाराष्ट्रात
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित आस्थापनांनी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.
Local Body Elections : गुलाबी मतपत्रिकांवर ठरणार नगराध्यक्षांचे भवितव्य
मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत न देणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कामगारांना कोणताही अडथळा न येता मतदान करता यावे यासाठी सर्व आस्थापना मालकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.








