The fate of the Municipal Council President will be decided by the pink ballot papers : सदस्यांची मतपत्रिका पांढरा, फिके निळे व फिके पिवळे रंगाचे
Buldhana आगामी नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नगराध्यक्ष पदासाठी फिका गुलाबी रंगाची मतपत्रिका, तर नगरपरिषद सदस्य पदांसाठी पांढरा, फिका निळा आणि फिका पिवळा अशा तीन रंगातील मतपत्रिका मतदान यंत्रावर (बीयू) वापरण्यात येणार आहेत. नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी मात्र फक्त पांढऱ्या रंगाची मतपत्रिका राहील. या मतपत्रिकांवर २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून नगराध्यक्ष आणि सदस्यांचे भवितव्य ठरणार आहे.
२६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सर्व राजकीय व अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यानंतरच उमेदवारांच्या अधिकृत प्रचाराला प्रारंभ झाला. निर्णय अधिकारी यांनी नियम १६(४) नुसार नमुना १६ प्रसिद्ध केला आहे. यात देवनागरी लिपीनुसार उमेदवारांच्या नावांचा क्रम निश्चित करण्यात आला असून, त्याच क्रमाने पोस्टल बॅलेट व मतदान यंत्रासाठी स्वतंत्र मतपत्रिका छापण्यात येत आहेत.
Local Body Elections : तिरंगी लढतीत शिंदेसेना–भाजप आमनेसामने!
राज्य निवडणूक आयोगाच्या २१ ऑक्टोबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार बीयूवरील मतपत्रिकांचे रंग निश्चित आहेत. सप्टेंबर २०२५ च्या सूचना पत्रिकेनुसार त्या मतदान यंत्रावर बसविल्या जाणार आहेत. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
स्थानिक ‘आरओ’ यांनी निश्चित केलेल्या दिनांकानुसार मतपत्रिका बॅलेट युनिटमध्ये बसविण्यात येतील. तांत्रिक अडचण न आल्यास यंत्रांना सील करून ते संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचविण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नगराध्यक्ष व सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग
नगराध्यक्ष पदासाठी : फिका गुलाबी
नगरपरिषद सदस्य पदासाठी : पांढरा, फिका निळा, फिका पिवळा
नगरपंचायत सदस्य पदासाठी : फक्त पांढरा
Vidarbha Farmers : तहसील कार्यालयाच्या छतावर स्वाभिमानींचे आंदोलन!
मतपत्रिकांची छपाई शासकीय मुद्रणालयात करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. मात्र अडचण असल्यास स्थानिक पातळीवरही छपाई करता येईल. परंतु, अशावेळी अतिरिक्त मतपत्रिका शिल्लक राहणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालयानंतर उरलेल्या मतपत्रिका जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर शासकीय कोषागारात जमा केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.








