Local Body Elections : मोर्शी व अचलपूरमध्ये पुन्हा महिलांना संधी, सलग दुसरी वेळ

Reservation for Mayor Posts Finalized in Amravati District : अमरावती जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित

Amravati अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी मुंबईत निश्चित करण्यात आले. या आरक्षणानुसार, मोर्शी आणि अचलपूर नगरपालिकांमध्ये सलग दुसऱ्यांदा महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या पुरुष नेत्यांना काहीशी अडचण निर्माण झाली आहे.

एकूण आरक्षणाच्या स्थितीनुसार, दहा नगरपालिकांपैकी सहा आणि दोन नगरपंचायतींपैकी एका ठिकाणी महिलांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये दोन ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिलांसाठी, तर एका ठिकाणी अनुसूचित जमाती (एसटी) महिलेसाठी पद राखीव आहे.

Anup Dhotre : भुसावळ–वर्धा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

एक नगरपंचायत आणि तीन नगरपालिकांचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आले असून या ठिकाणी कोणत्याही संवर्गातील व्यक्ती निवडणूक लढवू शकते.

अचलपूर ही ४१ सदस्य संख्या असलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. मागील वेळी येथे शिवसेनेच्या सुनीता फिसके नगराध्यक्ष होत्या आणि तेव्हा हे पद नामाप्र महिलेसाठी राखीव होते. यावेळी अचलपूरचे नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले, तर मोर्शी येथे नामाप्र गटातील महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. मागील वेळी मोर्शी येथे भाजपच्या मेघना मडघे नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे या दोन्ही नगरपालिका सलग दुसऱ्यांदा महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत.

वरुडचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाले असून शेंदुरजनाघाटचे नगराध्यक्षपद त्याच संवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. दर्यापूरचे नगराध्यक्षपद नामाप्र, तर अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (एससी) गटासाठी राखीव झाले आहे. चिखलदरा नगरपालिका नेहमीप्रमाणे एसटी गटासाठी राखीव आहे.

धामणगाव रेल्वे येथील नगराध्यक्षपद नामाप्र महिलेसाठी, तर चांदूर रेल्वे नगरपालिका आणि चांदूर बाजार नगरपालिका खुल्या गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र चांदूर बाजार येथे हे पद महिलांसाठी खुले असल्याने कोणत्याही संवर्गातील महिला निवडणूक लढवू शकते.

Sant Gadge Baba Amravati University : अकोल्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र?

आदिवासीबहुल मेळघाटातील धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद यावेळी खुल्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. परंपरागतपणे येथे एसटी गटातील व्यक्तीला संधी मिळत असली, तरी आता कोणत्याही संवर्गातील उमेदवार या पदासाठी स्पर्धा करू शकतो.
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील चार नगरपंचायतींपैकी तिवसा आणि भातकुली नगरपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्याने, या दोन ठिकाणी यावेळी निवडणूक होणार नाही.