Local Body Elections : शिवसेनेचा (शिंदे) ‘पहिला’ उमेदवारी अर्ज दाखल

Shiv Sena (Shinde faction) submits its ‘first’ nomination form : मेहकर नगराध्यक्षपदासाठी अजय उमाळकर रणांगणात

Mehkar मेहकर नगरपरिषदेच्या निवडणूक रणधुमाळीत गुरुवारी शिवसेना (शिंदे गट)–महायुतीने पहिली जोरदार एंट्री घेतली. अजय अरविंद उमाळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष दाखल केला. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून हा नगराध्यक्षपदाचा पहिलाच अर्ज ठरला आहे.

अजय उमाळकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत झाले. महायुतीतील सर्व घटक पक्षांशी चर्चासत्र सुरू असून सामंजस्याच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली होती.

उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोगी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी रामराजे कापरे यांच्या कार्यालयात मागील तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. गुरुवारचा मुहूर्त साधत अजय उमाळकर यांनी हा ‘पहिला अर्ज’ दाखल केला आणि मेहकरमध्ये निवडणूक चुरशीची चाहूल लागली.

Local body election : निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले

उमाळकरांच्या अर्जावेळी मोठी उपस्थिती
अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अंजलीताई अजय उमाळकर,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव
तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर
शहरप्रमुख जयचंद बाठिया
रविराज रहाटे, जितू सावजी, घनश्याम पाटील
यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

उमाळकरांची राजकीय-कार्यकारी पार्श्वभूमी
माजी नगरपालिका उपाध्यक्ष
महाराष्ट्र अर्बन पतसंस्था : कार्यकारी संचालक
समाजकारणात सक्रिय व गजानन महाराजांचे निस्सिम भक्त

Delhi blast case : कारब्लास्टचा मुख्य आरोपी उमर मोहम्मदचे घर केले उद्ध्वस्त !

मेहकरमधील महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. शिवसेनेने (शिंदे) उमाळकरांचा अर्ज दाखल करताच महायुतीत उत्साह, तर विरोधकांकडे रणनीती आखण्याची धांदल सुरू झाली आहे.