व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local body elections : मेहकरमध्ये ‘टोकन पॉलिटिक्स’चा धडाका!

Local body elections : मेहकरमध्ये ‘टोकन पॉलिटिक्स’चा धडाका!

‘Token Politics’ in Mehkar : ५० रुपयांच्या नोटेवर दोन हजारांची आशा; कुणीही जिंको, मतदाराचा फायदा ‘फिक्स’?

Mehkar : मेहकर नगरपालिका निवडणुकीत पैशांचा खेळ, खिरापती आणि मतदार खरेदीच्या चर्चांनी या वर्षीचा कलंकित इतिहास पुन्हा एकदा समोर आणला आहे. यंदाच्या निवडणुकीत तर ‘५० रुपयांच्या नोटेचे टोकन’ हा अनोखा फंडा राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. ज्याच्याकडे हे टोकन आहे, त्याला निकालानंतर दोन हजार रुपये ‘निश्चित’ मिळणार, अशी चर्चा शहरात वेगाने पसरली आहे.

स्थानिकांच्या मते, शहरातील प्रमुख तीन उमेदवारांनी हे टोकन वाटप करून मतदारांना “विश्वासाची खूण” दिली होती. ५० रुपयांच्या नोटेवर उमेदवारांची सही, घरातील एकूण मतदारांची संख्या अशा उल्लेखांसह टोकन देण्यात आले. ‘टोकन घेऊन या आणि राहिलेले दाम घेऊन जा’—अशी वदंता संपूर्ण मेहकरमध्ये पसरली आहे.

Jain Muni vs Raj Thackeray : तुम्ही चालू करा मग आम्ही पण चालू करू

कुणीही जिंको—एकाचा फायदा हमखास?

या टोकन पद्धतीमुळे काही मतदारांकडे दोन-तीन वेगवेगळ्या उमेदवारांचीही टोकने असल्याची माहिती बाहेर येत आहे. म्हणजे ज्याचाही विजय झाला तरी किमान एका टोकनवर दोन हजारांची कमाई ‘हक्काची’! परिणामी टोकन पद्धत ही मतदारांच्या चर्चेतील सर्वाधिक चर्चित ‘स्कीम’ ठरली आहे.

पराभव झाला तर?

टोकन वाटताना उमेदवारांनी सांगितलेली अटही तितकीच गाजत आहे—
उमेदवार जिंकला तर दोन हजार, हरला तर ५० रुपये नोट तुमचीच!
यातून उमेदवारांचा मतदारांवरील अविश्वास, तर मतदारांचा उमेदवारांवरील अविश्वास अधिकच अधोरेखित झाला आहे.

संकटात टाकणारी प्रचारशैली

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तब्बल सात उमेदवार रिंगणात होते. त्रिकोणी लढत तयार असताना ‘टोकन पॉलिटिक्स’मुळे परिस्थितीत अवघड वळण आले.
स्थानिकांचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षांत निवडणूक म्हणजे विकासापेक्षा ‘दाम’ आणि ‘डील’चा खेळ अधिक झाला आहे. प्रामाणिक, विकासाभिमुख कामांपेक्षा ‘निवडून आलो की बघू’ अशा मानसिकतेमुळे नागरिकांचा विश्वास ढासळल्याचेही स्पष्ट होते.

Maharashtra politics : शिंदे सेनेचे 22 आमदार भाजपकडे ?

निकालानंतरच खरी टोकनची किंमत कळणार

मेहकरमध्ये सध्या सर्वत्र एकच प्रश्न चर्चेत—
या टोकन पद्धतीने निकालात किती ‘जादू’ होणार?
निकालानंतर नक्की कोण जिंकतो आणि मतदारांसाठी दोन हजारांची ‘बोनस भेट’ प्रत्यक्ष मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!