Local Body Elections : दहा गटांतील मतदार ठरवणार जिल्हा परिषद महिला अध्यक्ष

Voters from Ten Groups to Decide Zilla Parishad Woman President : ५९ गटांपैकी २१ सर्वसाधारण गटांतील १० गट महिलांसाठी राखीव

Amravati जिल्हा परिषदेच्या गटनिहाय आरक्षणाची सोडत सोमवारी नियोजन भवनात काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले. एकूण ५९ गटांपैकी ११ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. या गटांतील विजेत्या महिला थेट ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावेदारी करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ग्रामीण भागात सर्वसाधारण गटातून उमेदवारी आणि विजयासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

नव्या आरक्षणानुसार कांडली, कुऱ्हा (चांदुर बाजार), हिवरखेड, कुऱ्हा (तिवसा), नांदगाव पेठ, वलगांव, खोलापूर, वाढोणा रामनाथ, आमला विश्वेश्वर आणि चिंचोली हे दहा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे या गटांतूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार निवडीसाठी विविध राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे.

MNS in Aghadi : आघाडीत सहभागी होण्यासाठी मनसेकडून प्रस्ताव नाही

याशिवाय पंचायत समितीच्या ११८ गणांच्या आरक्षणाने नव्या राजकीय समीकरणांना वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, मोर्चेबांधणीला वेग आला आहे. अनेक संभाव्य उमेदवारांचा हिरमोडही झाल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. कार्यकाळ संपल्यानंतर २० मार्च २०२२ पासून प्रशासक राज सुरू आहे. या दरम्यान तत्कालीन राज्य सरकारने मे २०२२ मध्ये पुनर्रचना करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा वाढवल्या होत्या, मात्र त्यावर स्थगिती आली होती. नंतर राज्य सरकार बदलल्यानंतर नवीन अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५९ आणि पंचायत समितीचे ११८ गण निश्चित झाले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी गट व गणांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहणार असून, सर्वसाधारण गटांतून विजयी झालेल्या महिलांपैकीच एक जण अध्यक्षपदी विराजमान होईल. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे.

Farmers in Trouble : ‘जळाला रे जळाला..’ म्हणत फसवे परिपत्रक जाळले !

सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित गट

तालुका गटाचे नाव

अचलपूर कांडली
चांदुर बाजार कुऱ्हा
मोर्शी हिवरखेड
तिवसा कुऱ्हा
अमरावती नांदगाव पेठ
अमरावती वलगांव
भातकुली खोलापूर
नांदगाव खंडेश्वर वाढोणा रामनाथ
चांदुर रेल्वे आमला विश्वेश्वर
धामणगाव रेल्वे चिंचोली

अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने, जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर ५९ गटांपैकी २१ सर्वसाधारण गटांतील दहा महिला गट निर्णायक ठरणार आहेत. या गटांत अचलपूर, चांदुर बाजार, मोर्शी, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांचा समावेश असून, हे तालुके अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतील.

Vote theft case : बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार!

अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने, विविध पक्षांतील दिग्गज नेते आपल्या निकटवर्तीय महिलांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी हालचाली करत आहेत. आगामी निवडणुकीसाठी पक्षांच्या तिकीट वितरणात मोठी चुरस निर्माण झाली असून, ग्रामीण राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत.