Local Body Elections : लावा पैज… कोण जिंकणार?’ नगरपरिषदेच्या निकालावर चर्चेला उधाण

War of claims over municipal council results : आणखी सात दिवसांची प्रतीक्षा, दावे-प्रतिदाव्यांनी रंगले वातावरण

Buldhana नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असले तरी न्यायालयाच्या आदेशामुळे मतमोजणी व निकाल २१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर गेल्याने राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. निवडणुकीनंतर शहरात आणि राजकीय वर्तुळात ‘लावा पैज, कोण जिंकणार?’ अशा दावे–प्रतिदाव्यांनी वातावरण तापले आहे.

नगराध्यक्षपदासाठी बुलढाणा शहरात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतदानानंतर लगेच मतमोजणी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती पुढे ढकलल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला. तरीही मिळालेल्या अतिरिक्त वेळेत आकडेमोड, अंदाज आणि चर्चांचा सपाटा सुरू आहे. कार्यकर्ते आपापल्या बाजू भक्कम असल्याचे दावे करत एकमेकांना थेट ‘लावतोस का पैज?’ असे आव्हान देत असल्याचे चित्र आहे.

Bogus caste certificate : ‘खरे सूत्रधार’ वाचवले जात आहेत, समितीचा आरोप

निवडणूक प्रचाराच्या काळात इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवारीवरून झालेली नाराजी आणि बंडखोरीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार निश्चित करताना नेत्यांची कसरत मोठी होती, तर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली. तरीही अखेर जोरदार प्रचारानंतर २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले.

मतदानानंतर वाढलेल्या प्रतीक्षाकाळामुळे सध्या राजकीय चर्चांना आणि पैजांच्या दाव्यांना उधाण आले आहे. कोण बाजी मारणार, कोणाला धक्का बसणार, यावर कार्यकर्त्यांमध्ये चुरशीच्या चर्चा सुरू असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले असतानाच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनीही तयारीला वेग दिला आहे.

CM Devendra Fadnavis : खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालणार

२१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच या ‘लावा पैज’ चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, तोपर्यंत बुलढाण्याच्या राजकारणात उत्सुकता आणि अंदाजांचा खेळ सुरूच राहणार आहे.