Local Body elections : झीरो रोस्टर’चा धक्का, बदलाची आस धरलेल्यांच्या मनसुब्यांवर फिरणार पाणी

Ward and Group Reservation Draw to be Held on October 13 : १३ ऑक्टोबरला गट व गणांची आरक्षण सोडत

Buldhana जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार असून, गट व गणांच्या आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ‘झीरो रोस्टर’ प्रणाली लागू होणार असल्याने अपेक्षित बदलाच्या आशेवर बसलेल्या अनेक राजकीय नेत्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

१ ऑक्टोबर रोजी घोषित कार्यक्रमानुसार, ६ ऑक्टोबरपर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांची प्राथमिक मोजणी करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यावर ८ ऑक्टोबर रोजी मान्यता मिळेल. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी स्तरावर आरक्षण सोडत काढली जाईल. या सोडतीत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय तसेच महिला आरक्षणाचे वाटप निश्चित होणार आहे. गणांसाठीची सोडत तहसील स्तरावर होईल, तर प्रारुप अधिसूचना १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Local Body Elections : भाजपचे सर्व आक्षेप मान्य; बुलढाणा नगरपरिषद प्रभागरचनेत बदल!

महत्त्वाचे टप्पे :

१४ ते १७ ऑक्टोबर : हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत.
२७ ऑक्टोबर : जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना अभिप्रायासह गोषवारा सादर करतील.
३१ ऑक्टोबर : अंतिम आरक्षण निश्चिती.
३ नोव्हेंबर : राजपत्र प्रसिद्धी.

२०११ च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या २०.२४ लाख आहे. त्यापैकी १९.६४% अनुसूचित जाती व ५.७२% अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. एकूण जिल्हा परिषद गटांची संख्या ६१ तर पंचायत समिती गणांची संख्या १२२ आहे.

Rahul Bondre : चिखलीत काँग्रेसकडून संविधान पूजन आणि मनुस्मृती दहन

दरम्यान, नागपूर खंडपीठाने झीरो रोस्टरविरोधातील विशेष अनुमती याचिका फेटाळल्याने निवडणुका याच पद्धतीनुसार घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा आरक्षणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत संभाव्य आरक्षण गृहीत धरून तयारी सुरू केलेल्या अनेक दिग्गजांच्या योजना धुळीस मिळू शकतात.