Whose equations will the voter turnout disturb? : १० पैकी ७ पालिकांमध्ये मतदान घट; मेहकर–चिखली–सिंदखेडराजा ठरले ‘गेमचेंजर’!
Buldhana जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये २ डिसेंबरला झालेल्या मतदानात ७ ठिकाणी झालेली घसरण आणि मेहकर, चिखली व सिंदखेड राजातील वाढलेला मतदान टक्का— या तिन्ही गोष्टींनी राजकीय समीकरणांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे. कोणाचे गणित जुळेल आणि कोणाचे बिघडेल, यावर सध्या राजकीय वर्तुळात तापलेल्या चर्चा सुरू आहेत.
जिल्ह्याची एकूण मतदान स्थिती
एकूण मतदार : 4,47,531
मतदान झाले : 3,10,690
एकूण मतदान टक्का : 69.12%
Arvi Panchayat Samiti : राजपत्रित अधिकारी संघटना सामूहिक रजेवर
जिल्ह्यातील जवळपास सहा लाख लोकसंख्येपैकी 75% मतदार, मात्र त्यापैकी फक्त 3.10 लाखांनी मतदान केल्याने एकूण टक्केवारी स्थिर असली तरी बहुतांश शहरांत घट झाली.
सकाळी मतदानाची गती धिमी होती; दुपारी ३ नंतर ओघ वाढला. काही मतदान केंद्रांवर तर साडेसातपर्यंत मतदान झाले. तरीदेखील सात शहरांत टक्केवारीत घट नोंदली गेली.
पालिका–निहाय मतदानातील चढउतार
पालिका 2016 2019/2025 +/ –
बुलढाणा 54.39 54.20 -0.19
चिखली 69.29 71.02 +1.73
जळगाव जामोद 70.56 67.87 -2.69
खामगाव 71.24 70.65 -0.59
लोणार 72.72 72.26 -0.46
मलकापूर 86.33 74.04 -12.29
मेहकर 70.59 74.41 +3.82
नांदुरा 78.98 74.59 -4.39
शेगाव 74.83 68.98 -5.85
सिंदखेड राजा 83.39 85.08 +1.69
Vidarbha Farmers : सेनगावमध्ये शेतकरी नेत्यावर ‘खोटे गुन्हे’?
बुलढाणा शहरातील 68,997 पैकी फक्त 37,396 मतदारांनी मतदान केले. गतवेळेपेक्षा तब्बल 20 टक्क्यांनी घट झाली. यासोबतच बोगस मतदान प्रकरणाचा गोंधळ, व्हायरल व्हिडिओ, संशयास्पद कार्ड, या सर्वांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी तिरंगी लढतीत आता जवळपास प्रत्येक मत महत्वाचे ठरणार आहे.
गेल्यावेळी जिल्ह्यात ‘वोटिंग चॅम्पियन’ असलेले मलकापूर यंदा 86.33% वरून थेट 74.04% पर्यंत खाली धडकले. इतकी मोठी घट कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणासाठी घातक ठरणार? यावर सध्या तज्ज्ञांमध्ये कडी–कडीने विश्लेषण सुरू आहे. नांदुरा येथेही 4.39% घट, ज्याचा थेट परिणाम सत्ता समीकरणांवर दिसण्याची शक्यता आहे.
मेहकर–चिखली–सिंदखेड राजाः कोणाचा तराफा तर कोणाचे बोट बुडणार?
मेहकर : +3.82% वाढ
चारमुखी लढत – शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना, भाजप
भाजप पहिल्यांदाच मैदानात
⇒ वाढलेला मतदान टक्का सत्ता उलटण्याचे संकेत?
चिखली : +1.73% वाढ
Tapovan trees : तुम्हाला निवडून दिलं म्हणून काहीही करण्याचे अधिकार मिळाले का?
चिखलीत नेहमीच संघर्ष, यंदा मतदान वाढल्याने निकाल ‘सरप्राइज’ देऊ शकतो.
सिंदखेड राजा : +1.69% वाढ
या पट्ट्यात वाढलेले मतदान म्हणजे परिवर्तनाचे सूचक, की विद्यमान समीकरणांनाच बळ?
यावर राजकीय तज्ज्ञांचे वेगवेगळे अंदाज.
‘मुक’ मतदार ठरवणार निकाल?
७ पालिकांत घटलेला उत्साह
३ पालिकांत वाढलेला मतदानाचा वेग
दोन्ही गोष्टी मिळून एकूण निकाल अत्यंत काट्याचा होईल, असे संकेत मिळत आहेत.








