Local Body Elections : चिखली स्ट्रॉग रूम ‘हायअलर्ट’वर!

Chikhli strongroom put on high alert ahead of vote counting : २० सशस्त्र जवान, २४X७ CCTV, मतमोजणीकडे लागले लक्ष

Chikhli नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख न्यायालयाने अचानक २१ डिसेंबर निश्चित केल्यानंतर चिखलीत राजकीय तणाव चांगलाच वाढला आहे. निकाल पुढे ढकलल्यामुळे उमेदवार आणि समर्थकांमध्ये नाराजीची लाट उमटली असतानाच, निवडणूक आयोग आणि प्रशासनाने मतपेट्यांना अक्षरशः अभेद्य सुरक्षा कवच प्रदान केले आहे. ‘ऑपरेशन सिक्युर व्होट्स’मुळे जिल्हा परिषद मैदानातील स्ट्रॉग रूम परिसर छावणीत परिवर्तित झाला आहे.

अभूतपूर्व सुरक्षा – स्ट्रॉग रूम किल्ल्यात बदलला

२० सशस्त्र जवान, SRPची विशेष तुकडी

३ कडक चेकपोस्ट — कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस प्रवेश अशक्य

संपूर्ण परिसरात २४ तास पोलिसांचा अभेद्य पहारा

अग्निशमन दलाची सुसज्ज गाडी सतत तयार

प्रत्येक प्रवेशबिंदूवर स्पेशल हँडी-कॅमेऱ्यांची नजर

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचा संशय?

मतपेट्यांवर SRPच्या बंदोबस्तासोबत स्थानिक पोलिसांचा २० जणांचा फौजफाटा क्षणोक्षणी नजर ठेवून आहे. शंका, अफवा आणि राजकीय तणाव लक्षात घेऊन प्रशासनाने मोठ्या एलईडी स्क्रीनवर स्ट्रॉग रूमचा CCTV लाईव्ह फीड उपलब्ध करून दिला आहे. विशेष परवानगी असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना रात्रंदिवस बसून प्रत्यक्ष सुरक्षा पाहण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हे पाऊल शहरातील ‘घुसखोरी’ किंवा ‘हॅकिंगसारख्या’ चर्चांना थेट उत्तर ठरले आहे.

आयोगाच्या आदेशानुसार एक तहसीलदार, दोन नायब तहसीलदार दररोज तीन वेळा अनिवार्य व्हिजिट करून खालील तपशील बारकाईने तपासत आहेत. स्ट्रॉग रूमचे लॉक व सील, CCTV रेकॉर्डिंग, व्हिजिटर लॉग, सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता यावर करडी नजर आहे.

२४ तास CCTV रेकॉर्डिंग — एकही क्षण नोंदविल्याशिवाय सुटणार नाही. स्ट्रॉग रूम परिसरातील सर्व कॅमेरे २४x७ रेकॉर्डिंग मोडवर आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादीचे प्रतिनिधी यांच्यावरही सतत देखरेख आहे. “एकही डोळा चुकत नाही” अशी यंत्रणा प्रशासनाने उभी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Balwant Wankhede : अमरावती स्टेशन स्थलांतराचा मुद्दा संसदेत!

निकालाच्या तारखेतील विलंबामुळे शहरात काही गटांकडून अफवा पसरवण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. यावर निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेत कठोर सुरक्षा उपाययोजना राबवल्या असून— “मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही कुचराई होऊ देणार नाही,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.