Local Body Elections : महाविकास आघाडीची ‘एकजूट’ तर महायुतीत गोंधळाचे ‘सूटबूट’!

Confusion in Mahayuti, While MVA Stands United : नगराध्यक्षपदावरून शिंदेसेना-भाजपमध्ये थंड युद्ध; महाविकास आघाडी रणांगणात सज्ज

Buldhana आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे महायुतीत मात्र अंतर्गत मतभेद आणि समन्वयाअभावी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिंदेसेनेचे जिल्हा संघटक व आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. या दोन नेत्यांतील वितुष्टामुळे महायुतीच्या तालमीवर परिणाम झाल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांनी एकत्रितपणे विजयासाठी काम करावे, असे आवाहन केले असले तरी बुलढाण्यातील प्रत्यक्ष स्थिती अजूनही अनिश्चित आहे.

Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’चा लाभ मिळाला नाही म्हणून पत्नीला मारहाण!

नगराध्यक्षपदावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपने ‘नगराध्यक्षपद आमच्याकडे आले तरच युती टिकेल,’ असा ठाम पवित्रा घेतला आहे. तर शिंदेसेना आपल्या बालेकिल्ल्यांतील मेहकर व लोणारमधील संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला आलेल्या माहितीनुसार, शिंदेसेनाला पक्षांतर्गत तसेच स्थानिक पातळीवरील दबावाचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी आघाडीतीलच गट स्वतंत्र समीकरणे मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बुलढाण्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे तीनही घटक पक्ष समन्वयातून निवडणुकीच्या तयारीस लागले आहेत. काँग्रेसने ५ नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या असून, मागील निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पुन्हा संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

मागील वेळी मतविभाजनामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला दोघांनाही फटका बसला होता. यंदा मात्र आघाडीने ‘एकदिलाने’ लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Local Body Elections : भाजप–युवा स्वाभिमानचं गठबंधन ठरलं!

भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) आणि काही स्थानिक संघटनांसोबत प्रारंभिक स्तरावर चर्चा केली असली तरी, स्थानिक स्तरावरील मतभेद आणि नगराध्यक्षपदावरील वादामुळे गोंधळ कायम आहे.

नगर पालिकेत असे होते नागसेवक

२०१८ च्या निवडणुकीत बुलढाणा नगरपालिकेत

शिवसेना – १०,

काँग्रेस – ७,

भाजप – ५,

राष्ट्रवादी – ३,

इतर – ३ नगरसेवक निवडून आले होते.

यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.