Local body elections:प्रारूप मतदार यादीला अंतिम रूप; १० डिसेंबर रोजी होणार प्रसिद्ध

Draft voter list finalized : महापालिकेत तक्रारींचा ढीग; आक्षेप व तक्रारी केवळ खानापूर्ती तर ठरणार नाहीत ना?

Amravati : आगामी अमरावती महापालिका amravati municipal corporation सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवरील आक्षेपांची सुनावणी सोमवारपर्यंत पूर्ण झाली आहे. दरम्यान, ८ डिसेंबर रोजी मतदार यादीचे कंट्रोल शीट तयार करण्यात आले असून यादीला आता अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी अधिकृतरित्या प्रसिद्ध होईल.

सोमवारी मतदार यादीतील त्रुटी व घोळांविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी घेऊन माजी नगरसेवक तसेच नागरिक महापालिकेत दाखल झाले. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि इतर अधिकाऱ्यांनी या तक्रारी ऐकून घेतल्या. मात्र, या तक्रारींवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सदोष यादीवरच निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Local body elections: निवडणूक लांबणीवर कोणाच्या पथ्यावर?, सारेच संभ्रमात

अमरावती महापालिकेच्या मतदार यादीनुसार अद्यापही २५ हजार ४३१ दुबार मतदारांची नोंद जैसे थे आहे. प्रारूप यादीतील त्रुटींविषयी माजी नगरसेवक प्रशांत वानखडे, ऋषी खत्री, संध्या टिकले, बंडू हिवसे, राजेंद्र महल्ले, मुन्ना राठोड, समीर जवंजाळ, बादल कुळकर्णी आदींनी तक्रार नोंदविली आहे.

मतदार यादीसंदर्भातील प्रमुख तक्रारी

प्रभाग क्रमांक १८, राजापेठ – श्री संत कंवरराम:
प्रारूप यादी क्रमांक १३४ मधील अनुक्रमांक १०७७३ (शिकारी पुन्नीबाई, घर क्र. २०२) या एकाच घरात तब्बल ४५ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक १८, राजापेठ – श्री संत कंवरधाम:
प्रारूप यादी क्रमांक १७५ मधील अनुक्रमांक २३०३१ पासून जवळपास २०० नावे दुसऱ्या ठिकाणी दाखविण्यात आली आहेत.
संबंधित घराचा पत्ता ‘सांगर राऊत’ यांच्या नावाने नोंदविलेला असून राऊत कुटुंब या ठिकाणी राहत नसल्याचा आरोप आहे.

प्रभाग mismatch:

राजापेठ (प्रभाग १८) येथे दाखविण्यात आलेले अनेक मतदार प्रत्यक्षात बेनोडा प्रभाग क्रमांक १० येथे राहतात. त्यांची नावे बेनोडा प्रभागात दाखल करावीत, अशी मागणी.

Local body elections: खामगावमध्ये ‘स्ट्राँग रूम’ अलर्ट, निकालाची तयारी पूर्ण

स्वामी विवेकानंद प्रभाग क्रमांक १२ मधील मतदारांची नावे चुकीने राजापेठ प्रभागात समाविष्ट झाली आहेत.

प्रभाग क्रमांक २०, सूतगिरणी:
या प्रभागातील मतदार यादी अनुक्रमांक ४३,००० पर्यंत असल्याचे उघड झाले असून, ही यादी नियमांनुसार नसल्याची तक्रार करण्यात आली.