Eknath Shinde has confirmed his responsibilities for Nagpur district : कृपाल तुमाने यांच्यावर चार विधानसभा मतदारसंघ तर जयस्वाल आणि पांडव यांनाही महत्त्वाची जबाबदारी
Nagpur : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नागपूर जिल्ह्यात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) संघटनात्मक तयारी गतिमान केली आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती केली. आता नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार केली जात आहेत.
जिल्ह्यातील सावनेर, हिंगणा, उमरेड, आणि कामठी या चार महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांतील एकूण सात नगरपरिषदा आणि नऊ नगर पंचायतींची जबाबदारी शिवसेनेचे उपनेते कृपाल तुमाने यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील संघटनात्मक प्रभाव आणि स्थानिक संपर्क दांडगा असल्यामुळे तुमाने यांच्यावर शिंदेंचा विश्वास अधिक असल्याचे मानले जात आहे.
Internal disputes in Congress : सुनील केदारांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना खुले आव्हान !
रामटेक विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणुका हाताळण्याची जबाबदारी राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांना देण्यात आली आहे. जायस्वाल हे रामटेकमधील प्रभावी नेते आहेत. त्यांच्या रणनितीचा निवडणुकीत मोठा उपयोग होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांना आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघ, कळमेश्वर तालुका आणि खापा नगर परिषद या भागाची निवडणूक जबाबदारी किरण पांडव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पांडव यांच्या संघटन कौशल्यामुळे काटोल परिसरात पक्षाला चांगले यश मिळू शकेल, अशी पक्षाला अपेक्षा आहे.
Misappropriation of government land : ताथवडे शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारात सहदुय्यम निबंधक निलंबित !
शिवसेनेने जिल्हाभरात निवडणुकीचे गणित वेगाने मांडण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील समन्वय वाढवण्यासाठी या जबाबदाऱ्यांचे वितरण महत्त्वाचे ठरणार आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या निवडणूक च तयारीला गती मिळाली आहे. महायुतीतही एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.








