Breaking

Local Body Elections : पंचायत समिती सभापतीची निवड दृष्टीपथात!

 

Election of Panchayat Samiti Chairman on Monday : आठ पंचायत समितीची निवडणूक सोमवारी

Gondia विद्यमान पंचायत समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी सभापतीची निवड करण्यासाठी सोमवारी (दि.२०) निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही पंचायत समितीला नवे शिलेदार मिळणार असून ते याकडे जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव अशा एकूण आठ पंचायत समिती आहेत. पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला. सभापतीपदाची आरक्षण सोडत निघाल्यानंतर २० जानेवारीला निवडणूक जाहीर करण्यात आली.

Mahayuti Government : भंडाऱ्याचा कारभार १९१ किलोमीटर लांबून !

त्यानुसार सोमवारी (दि.२०) सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या आठपैकी सहा पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. तर या निवडणुकीत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. सभापती व उपसभापतीपदी भाजप सदस्यांची वर्णी लागणे निश्चित आहे. गोंदिया पंचायत समितीत गेल्या निवडणुकीत चावी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्रीत येत सत्ता स्थापन केली होती. पण आता आमदार विनोद अग्रवाल हे भाजपवासी झाले आहेत. त्यांच्या चावी संघटनेचे सुध्दा त्यात विलनीकरण झाले आहे.

Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’

त्यामुळे येथे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करते की राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पाच पं.स.चे सभापतीपदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाल्याने तिथे महिला सभापती विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे.

सहा पंचायत समितीत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. पण निवडणुकीच्या वेळी दगाफटका होवू नये म्हणून सदस्यांना पर्यटनासाठी पाठविण्यात आले होते. हे सदस्य सोमवारी सकाळीच परतणार असून ते निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार आहेत. सदस्यांमध्ये फुट पडू नये याची सुध्दा काळजी घेतली जात आहे.