Only four days for campaigning in municipal elections : दिग्गज नेत्यांसमोर ‘गड’ वाचवण्याचे आव्हान, जिल्ह्यात ११ नगरपालिकांच्या निवडणुका
Buldhana चार वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. मंगळवारपासून संबंधित नगर परिषदांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी प्रचाराला केवळ चार दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे गड टिकवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षीय आघाड्यांच्या नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे.
बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि मलकापूर या ११ नगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय नकाशा मोठ्या प्रमाणात बदलला आहे. सध्या सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार तर मेहकरमध्ये उद्धवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारासमोर आपला ‘गड’ कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या स्वतंत्र लढणार की एकत्र, यावर अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आणि तर्कवितर्क सुरू असून, स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Local Body Elections : थेट नगराध्यक्षांसह १,१२२ सदस्यांसाठी होणार लढत!
या निवडणुकीत एकूण ४ लाख ७७ हजार २५७ मतदार सहभागी होणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार खामगाव (७३,५३८) आणि बुलढाणा (६८,९९७) येथे आहेत, तर सर्वात कमी सिंदखेड राजा (१४,३९४) येथे आहेत.तसेच चिखली ५६,१२३, मेहकर ३७,९३८, शेगाव ५५,०६२, मलकापूर ५८,०४५, देऊळगाव राजा २९,३२७, लोणार १९,७८२, नांदुरा ३८,३३८, जळगाव जामोद २५,७१३. एकूण १४१ प्रभागांमधून २८६ नगरसेवक आणि ११ नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. थेट नगराध्यक्ष निवड प्रणालीमुळे या निवडणुकीत चुरस अधिक वाढली आहे.
Vanchit Bahujan Aghadi : ती पोलीस भरती रद्द करा, वंचित आघाडीची मागणी
असे आहे आरक्षण
अनुसूचित जातींसाठी: शेगाव, जळगाव जामोद, देऊळगाव राजा (महिला) ,
मागासवर्ग (ओबीसी): मलकापूर, खुला प्रवर्ग: चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खुला (महिला): खामगाव, बुलढाणा, लोणार, नांदुरा








