Local Body Elections : शिवसेनेची तयारी जोरात, मेहकरमध्ये ‘शिवसंकल्प’!

Shiv Sena gears up; training camp held in Mehkar : ५ नोव्हेंबरला पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, विजयाचा कानमंत्र देणार

Mehkar शिवसेना पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी आणि कार्यपद्धतीत नवी ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘शिवसंकल्प शिवसेना जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर’ ५ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केले आहे.

शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिबिराचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. हे शिबिर मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे खास उभारण्यात आलेल्या शामियान्यात पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता नोंदणी आणि अल्पोपहारानंतर सकाळी १० वाजता प्रतापराव जाधव आणि सार्वजनिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.

Crime news : भोंदू बाबाने IT इंजिनिअर सह शिक्षक पत्नीला 14 कोटींनी लुटलं!

यानंतर लक्षवेध ॲप प्रशिक्षण, धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष या विषयावर डॉ. राजश्री आहेर राव यांचे व्याख्यान, राजकारणात समाज माध्यमांचा प्रभाव या विषयावर प्रतीक शर्मा यांचे मार्गदर्शन आणि संघटन बांधणी या विषयावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे सत्र होणार आहे.

महिला सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी “राजकारणात महिलांचा सहभाग” या विषयावर शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांचे भाषण होईल. त्यानंतर प्रा. राजेश सरकटे (संभाजीनगर) यांचा ‘स्वर्विहार’ हा गीतांचा कार्यक्रम सादर होईल.

Local Body Elections : नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी थोपटले दंड!

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतापराव जाधव म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीला प्राधान्य राहील. तीनही पक्षांचा सन्मान राखत युती केली जाईल आणि उमेदवारी इलेक्टिव्ह मेरिटवर दिली जाईल.” माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मेहकर-लोणार परिसरात तब्बल ५ हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मेहकर शहरातच ९३२ कोटींची कामे पूर्ण झाली असून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू आहे.”