Election Commission announces appointment of Election Officers : आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर; बुलढाणा जिल्ह्यातील यंत्रणाही सज्ज
Buldhana राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे आता वेगाने पावले पडू लागली आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी एका आदेशान्वये २४७ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत.
या आदेशानुसार, ‘अ’ व ‘ब’ वर्गातील नगर परिषदांसाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. संबंधित जिल्ह्यात आवश्यकतेनुसार उपजिल्हाधिकारी उपलब्ध नसल्यास विभागीय आयुक्तांना इतर जिल्ह्यातून अधिकारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Crime news : भोंदू बाबाने IT इंजिनिअर सह शिक्षक पत्नीला 14 कोटींनी लुटलं!
तसेच ‘क’ वर्ग नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यातील तहसीलदारांची मदत घेण्यात येणार आहे.
नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे निवडणूक प्रक्रिया हाताळण्याचा अनुभव, प्रामाणिकपणा व सचोटी असणे आवश्यक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रत्येक नगर परिषद आणि नगर पंचायतीतील मुख्याधिकारी यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Kharif Season Crops : तीन तालुक्यातील २९८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त
याशिवाय, अ व ब वर्ग नगर परिषदांसाठी तहसीलदार संवर्गातील अधिकारी, तर क वर्ग नगर परिषद व नगर पंचायतींसाठी नायब तहसीलदार संवर्गातील अधिकारी यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची तरतूदही आदेशात करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून ही नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, निःपक्ष आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ही पायरी महत्त्वाची ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणाही या आदेशानंतर सज्ज झाली आहे.








