Organizing various programs to increase contact with voters : मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
Washim : वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी मोठ्या जोशात सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड या नगरपरिषदांचा तसेच मालेगाव आणि मानोरा नगरपंचायतींचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक राज लागू आहे. प्रशासकांद्वारे केवळ शासकीय कामे केली जात असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. लहान-मोठ्या अडचणी सोडवल्या जाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
Digital Arrest : संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले, ६५ लाखांचा गंडा
इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी
नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. इच्छुकांनी वार्ड पातळीवर वैयक्तिक भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महिला कार्यकर्त्यांकडून हळदीकुंकवाचेही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
प्रशासक राज सुरू
वाशिम जिल्ह्यात ५२ सदस्यांची जिल्हा परिषद आणि १०४ सदस्य असलेल्या सहा पंचायत समित्या आहेत. प्रशासक राजमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. न्यायालयीन सुनावणीनंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कार्यकाळ वाढणार अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे.
राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार
नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये एकाच जागेसाठी अनेक इच्छुक रिंगणात असतात. यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच बंडखोरीची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार की स्वतंत्र, याविषयी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही़.
मतदारांनी थेट संपर्क साधाताहेत इच्छुक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इच्छुकांनी मतदारांशी नाते दृढ करण्यासाठी हालचालींना गती दिली आहे. मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवार करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. मरण असो की लग्नसोहळा, वाढदिवस असो इच्छुक उमेदवार उपस्थिती लावत असल्याचे चित्र आहे.