Seven-member committee formed to probe the rise in water level of Lonar Lake : न्यायालयाचा हस्तक्षेप, कारणे शोधून उपाययोजना सूचवणार
Buldhana जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील सतत वाढणाऱ्या जलस्तराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेत अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली आहे. या समितीवर जलस्तरवाढीची नेमकी कारणे शोधून आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे पर्यावरणप्रेमी, पुरातत्त्व अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अलिकडील काही महिन्यांत सरोवरातील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जैवविविधता आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत होती. विशेषतः सरोवर परिसरातील १२व्या शतकातील अनेक प्राचीन मंदिरे अंशतः पाण्याखाली गेल्याने या प्रश्नाने अधिक गंभीर स्वरूप धारण केले. सरोवरातील पाण्याचे रासायनिक गुणधर्म बदलल्याने लाखो वर्षांच्या इतिहासात प्रथमच येथे मासे आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
Akola Congress : अकोला जिल्हा काँग्रेसला मिळणार का सक्षम नेतृत्व?
न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत ही महत्त्वाची दिशा ठरविण्यात आली. समितीत बुलढाणा जिल्हाधिकारी सचिव म्हणून काम पाहणार असून वन विभाग, तांत्रिक तज्ज्ञ, भूजल अभ्यासक, VNIT, CSIR तसेच न्यायालयीन मित्रांचा समावेश करण्यात आला आहे. समितीने येत्या १५ दिवसांत लोणार परिसरात प्रत्यक्ष बैठक घेऊन अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना
सुनावणीदरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला. जैवविविधता कायदा २००२ मधील कलम ३७ अंतर्गत लोणार सरोवराचा वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत राज्य जैवविविधता मंडळाने ६ मेपर्यंत शपथपत्र दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.








