Maharashtra budget 2026 : मुख्यमंत्र्यांनी दिले नागपूरकरांना मोठे गिफ्ट; नवे नागपूर, तिसरा रिंगरोड आणि चित्रपटनगरी

devendra-fadnavis-announced-new-nagpur-third-ring-road-film-city : विद्या केंद्र स्थापन करण्याची घोषणा, २५ किलोमीटर क्षेत्रफळाच्या विकासाची जबाबदारी

Nagpur मुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मांडणारे दोन्ही मंत्री नागपूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे ते नागपूरकरांना काय गिफ्ट देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्र्यांनी नवीन नागपूर व्यापार व विद्या केंद्र स्थापन करण्यासह आणखी एका नव्या रिंगरोडची घोषणा आज केली. त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या विकासाची सुरू असलेली घोडदौड आणखी वाढणार आहे. नागपूर झपाट्याने विकसित होत आहे. लोकसंख्येचा विस्तारही वाढत चालला आहे. शहराच्या चारही बाजूची गावे आता शहरात येऊ लागली आहे. या गावांच्या विकासासाठी मेट्रो रिजनची स्थापना केली आहे.

Maharashtra budget 2026 : पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प ते‘तिसरी-चौथी मुंबई’ विकास आराखडा

मेट्रो रिजन प्राधिकरणाला शहराच्या सभोवताल असलेल्या २५ किलोमीटर क्षेत्रफळाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जुन्या शहरात जागा अपुरी पडत आहे. मुलभूत सुविधांवर आत्तापासूनच ताण येत आहे. हे लक्षात घेऊन नवे नागपूर विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला होता.

Maharashtra State Budget 2026 : शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंत कर्ज माफ; मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा

आज अर्थसंकल्पात त्याची अधिकृत घोषणा केली. हिंगणा विधानसभा मतदारसंघात हे नवीन शहर विकसित होणार आहे. मिहान प्रकल्प, बुटबोरी एमआयडीसी मध्ये हे नवे नागपूर असणार आहे. या शहरासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या नव्या नागपूरमध्ये बसवली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा वर्दळ वाढणार आहे. वाहतुकीची समस्याही निर्माण होणार आहे. हे गृहीत धरून तिसरा रिंगरोड विकसित केला जाणार आहे.