maharashtra-budget-2026-devendra-fadnavis-major-announcements-farmer-loan-waiver-third-fourth-mumbai : अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा
Mumbai : राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, ऊर्जा, पर्यटन आणि शहरी विकास या क्षेत्रांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणी, ग्रीन एनर्जी प्रकल्प, मेट्रो विस्तार, नव्या शहरांचा विकास आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देताना सरकारने २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. तसेच शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राबवली जात असून फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाल्याची माहिती देण्यात आली.
शहरी विकासाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. राज्यातील शहरी लोकसंख्या भविष्यात ७० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज लक्षात घेऊन शहरी सेवा डिजिटल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्या आणि आर्थिक विस्ताराला लक्षात घेऊन उरण परिसरात “तिसरी मुंबई” विकसित करण्याचा आराखडा जाहीर करण्यात आला. याशिवाय वाढवण परिसरात “चौथी मुंबई” उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशात १० लाख नवी घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी विशेष रोडमॅप तयार करण्यात येणार आहे.
वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासावरही सरकारने मोठा भर दिला आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील तीन स्थानके २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईतील वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान मेट्रो मार्गिका क्रमांक ११ हा सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा भूमिगत प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तसेच मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मेट्रो मार्ग क्रमांक ८ सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जाणार आहे.
Buldhana Shivsena : बुलढाणा उद्धवसेनेत मोठी खळबळ; जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांचा राजीनामा
राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी १ हजार २०० किलोमीटर मेट्रो मार्ग आणि ६ हजार किलोमीटर द्रुतगती मार्ग विकसित करण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. दक्षिण मुंबईला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी २०२८ पर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असेही जाहीर करण्यात आले.
जलवाहतूक क्षेत्रातही मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३४० किलोमीटरपर्यंत जलमार्गांचे जाळे विकसित केले जाणार असून प्रवासी संख्या १ कोटी ६० लाखांवरून तब्बल ७ कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेवर विशेष भर देण्यात आला आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेअंतर्गत ३२ हजार ७५६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चालू वर्षासाठीही सुमारे २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे नमूद करण्यात आले.
विमानतळ विकासालाही अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून २५ डिसेंबर २०२५ पासून देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळांवर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
उद्योग क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवत राज्याने नवे गुंतवणूक धोरण जाहीर केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघु उद्योग केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सुमारे ५० लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा नव्या स्टील हब म्हणून विकसित करण्या…








