Chandrapur drain issue raised in the Assembly, Vadettiwar’s allegation : वडेट्टीवारांचा आरोप, चंद्रपूरच्या नाल्याचा प्रश्न विधानसभेत गाजला
Mumbai: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण बांधकामाचा विषय आज विधानसभेत चांगलाच गाजला. दोन धनाड्यांचे बंगले वाचवण्यासाठी 98 लाख खर्च करुन संरक्षण भिंत बांधण्यात आली. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ठेकेदारावर सरकार कारवाई करणार आहे का ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि माहिती घेऊन उत्तर द्या असे मंत्र्यांना सुनावले.
दोन धनाढ्य लोकांचे बंगले या नाल्याच्या शेजारी आहेत. तेवढीच संरक्षण भिंत बांधली . एका व्यक्तीला, त्याच्या जागेला, संरक्षण देण्यासाठी इतका खर्च झाला आहे. भर टाकून नाला बुजवला आहे. याची चौकशी करा आणि या नाल्याची रुंदी पहिल्याप्रमाणे राहिल का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला. ते बांधकाम चुकीचे झाले आहे. म्हणून चुकीचे बांधकाम करण्यात जे जे दोषी आहेत त्यांच्या वर कारवाई करणार का? हा प्रश्न आहे, असे ही वडेट्टीवार म्हणाले.
Devendra Fadnavis-Sanjay Raut clash : मुंबईवरून फडणवीस-राऊतांमध्ये जुंपली, काढला एकमेकांचा बाप !
या नाल्याची संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्तीच्या फायद्यासाठी आहे का? या संदर्भातील फोटो मागवा, माहिती घ्या आणि मग उत्तर द्या. ज्या अधिकाऱ्यांनी ही संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची दोन घर आहेत. लोकवस्ती वाचवण्यासाठी काम झाले नाही, तसे असते तर विरोधाचे कामच नव्हते. पण कोणाच्या संरक्षणासाठी, बंगल्याची जागा वाचवण्यासाठी त्याला लेआउट टाकून प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली. त्याला प्रचंड विरोध आहे. म्हणून हे बांधणारे, डिझाईन करणारे, जागा सिलेक्शन करणारे दोषी आहेत.
पूर्णतः चुकीचे काम झाले आहे त्यामूळे तो नाला अरुंद झाला आहे.या ठिकाणी हे बांधकाम करताना लोक वस्ती वाचवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट व्यक्तीच्या जागेला प्रोटेक्शन देण्यासाठी ही भिंत बांधण्यात आली. म्हणून हे चुकीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने आणि फुकटचा खर्च करणाऱ्यावर कारवाई करणार आहात का? असा सवाल ही वडेट्टीवार यांनी केला.
प्रश्नाला उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, हे काम जिल्हा नियोजन समिती मधून केले होते. मुख्य भागातून नाला जातो. उर्वरित बांधकाम बाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला जाईल.तसेच भूमिलेख अभिलेखाकडून याची निश्चितपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन मंत्री राठोड यांनी सभागृहात दिले. नाल्याची नैसर्गिक रुंदी राखण्यात यावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश दिले.