Maharashtra Navnirman Sena : ‘लावा मराठी पाटी, नाहीतर मनसे घेईल गाठीभेटी’

Aggressive against English boards on shops : बुलढाणा मनसेचा इशारा, इंग्रजी पाट्यांच्या विरोधात आक्रमक

Buldhana सर्वोच्च न्यायालयाच्या २०२३ च्या निर्देशानुसार राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक (पाट्या) लावणे बंधनकारक आहे. मात्र, बुलढाणा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही इंग्रजी पाट्या दिसत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे.

“एका आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, अन्यथा इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानदारांच्या गाठीभेटी मनसे घेईल,” असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला.

Ladki bahan Yojana ; पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही !

रिंढे पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात मराठी पाट्या लावण्याची मोहीम संथ झाली आहे. याचा फायदा घेऊन अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांवर मोठ्या अक्षरात इंग्रजी नावे लिहिली आहेत. डिजिटल आणि आकर्षक फाँटमधील इंग्रजी अक्षरे सर्वसामान्य मराठी नागरिकांना न वाचता येण्यासारखी आहेत.

“मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी मनसे नेहमीच लढली आहे. दुकानदारांनी एका आठवड्यात इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

Ravikant Tupkar : ‘शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा’, रविकांत तुपकर आक्रमक

रिंढे पाटील म्हणाले, “मराठी पाट्यांसाठी आम्ही यापूर्वी यशस्वी आंदोलने केली आहेत. पुढेही आक्रमक भूमिका कायम ठेवणार. इंग्रजी पाट्या न काढणाऱ्या दुकानदारांना मनसे स्टाईलचा अनुभव घ्यावा लागेल.”