Maharashtra Navnirman Sena : महापालिकेच्या झोन कार्यालयात मटण मार्केट लावू, मनसेचा इशारा

MNS aggressive against illegal mutton market : अवैध मार्केट हटविण्यासाठी दिला एक आठवड्याचा अल्टिमेटम

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळताच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सत्ताधारी तर घरोघरी जाऊन सरकारच्या कामांचा प्रचार करणारच आहेत. मात्र विरोधकांना आंदोलन, मोर्च्यांशिवाय पर्याय नाही. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑरेंज स्ट्रिटवरील मटण मार्केटच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. एक आठवड्यात हे मार्केट हटवले नाही, तर महापालिकेच्या झोन कार्यालयात जाऊन विक्री करू, असा थेट इशारा मनपाला दिला आहे.

वारंवार निवेदन देऊनही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार नगर, जयप्रकाश नगर येथील नागरिकांच्या भावना कळत नाहीत. लक्ष्मी नगर झोन क्रमांक एकचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुकानदारांशी काही लागेबांधे असण्याचीही शक्यता आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने पुरावे सादर करून सहाय्यक आयुक्त चौधरी व निरीक्षक केळझरकर यांना निवेदन दिले. त्यासोबतच हे चिकन व मटण विक्रेते कोण आहेत? कुठल्या भागातील नागरिक आहेत? याची माहिती मनपाकडे उपलब्ध आहे का? असा सवालही मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी केला.

Zilla Parishad : पेन्शन अदालतमध्ये अधिकारीच नसतात, कोण निर्णय देणार?

मनसे शिष्टमंडळाने झोन क्रमांक १ च्या सहायक आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून खामला सोनेगाव मार्गावरील जयप्रकाश नगर व सहकार नगरमध्ये अवैध चिकन व मटण मार्केट मनपाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे मार्केट फुटपाथवर आहे. या अवैध दुकानांसमोर बेवारस कुत्र्यांची फौज उभी असते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सोबतच अपघातांचीही संख्या वाढत आहे. सतत होणारे अपघात, काही वेळा भीषण अपघात होऊन लोकांना अपंगत्व आले. तरीही मनपाचे लक्ष्मी नगर झोनने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

Mangalprabhat Lodha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांमध्ये संधी

शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्यासोबत महिला सेनानागपूर शहर अध्यक्षा रोशनी खोब्रागडे, विभागअध्यक्षा प्रिया बोरकुटे, विभाग संघटक चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष रामोजी खोब्रागडे, अजिंक्य मिश्रा, व्यापारी सेना विभाग संघटक चेतन बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.