व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mangalprabhat Lodha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांमध्ये संधी

Mangalprabhat Lodha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांमध्ये संधी

Apprenticeship in local industries for ITI students : कौशल्य विकास मंत्र्यांचे निर्देश, एक लाख उमेदवारांना प्रशिक्षणाचे टार्गेट

Mumbai : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अप्रेंटिसशीप द्यावी, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आता त्यांच्या जिल्ह्यातल्या उद्योगात विद्यावेतनासह काम करण्याची संधी मिळणार आहे. यात एक लाख उमेदवारांना प्रतिवर्षी प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली औद्योगिक आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागिरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी, राज्यात ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राबवण्यात येत आहे. मंत्री लोढा यांच्या नेतृत्वात प्रतिवर्षी तब्बल एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार 30 व त्यापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांसह मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या किमान 2.5 टक्के ते कमाल 25 टक्के शिकाऊ उमेदवारीच्या जागा स्थित करणे बंधनकारक आहे.

Local Body Elections : ‘स्थानिक’ निवडणुकांबाबत काय म्हणतात महायुतीचे नेते ?

सदर योजना 27 गटातील 258 निर्देशित, 35 क्षेत्रातील 414 वैकल्पिक, तंत्रज्ञ व्यवसायिक अंतर्गत सहा गटातील 20 आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या 123 व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी लागू करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी व्यवसायनिहाय सहा ते 36 महिने आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षित तसेच अप्रशिक्षित उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे.

शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सुधारित अभ्यासक्रमांचाही वेळोवेळी आढावा घेऊन त्या ट्रेड्स या योजनेत समाविष्ट केल्या जातील. राज्य आणि केंद्र शासनाच्या नियमानुसार मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना आवश्यक ती प्रतिपूर्ती केली जाणार आहे. दरम्यान राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप मिळत असल्याने आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Bacchu Kadu Strike : शरद पवारांचा फोन, मनोज जरांगेची भेट, अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी नियुक्ती दिली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या. आता महानगरपालिकेत पूर्वीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामधील विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी नियुक्ती देण्याबाबत मंत्री लोढा प्रयत्नशील असून यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्रही दिले आहे. लवकरच मुंबई महापालिकेसोबत इतर महापालिकांमध्येही विद्यार्थ्यांना अँप्रेन्टीसशिपची संधी मिळणार आहे.

error: Content is protected !!