Maharashtra politics : उपऱ्यांना सन्मान, निष्ठावंतांचा अपमान? अखेर भाजपाने निष्ठावंताला दिले पुनःस्थान !

bjp loyal workers reinstated maharashtra politics : भाजपातील संघर्षाला पूर्णविराम; भारतीय ते पाझारेपर्यंत अनेकांना पुन्हा पक्षात स्थान

Mumbai: भारतीय जनता पक्षात गेल्या काही काळापासून उफाळून आलेल्या उपरे विरुद्ध निष्ठावंत संघर्षावर अखेर तोडगा निघाला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अपक्ष लढलेल्या जुन्या व निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आलेली होती. ही सहा वर्षांची कठोर कारवाई आता मागे घेण्यात आली असून निष्ठावंतांना पुन्हा पक्षात स्थान मिळाले आहे. त्यामुळे पक्षात दीर्घकाळ निर्माण झालेली नाराजी आणि तणाव लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.

भाजप हळूहळू उपर्यांच्या हातात जात असल्याची भावना तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये होती. जेंव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेपासून कोसो दूर होता तेंव्हा निष्ठावंतांनी संघर्ष केला.अशा निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करून बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांनी भाजपा पक्ष उपर्यामुळे नाही तर निष्ठावंतांवर पक्ष उभा आहे. त्यामुळे निलंबन कार्यवाही मागे घेऊन पक्षातील कार्यकर्त्याला पक्षात सामावून घ्या अशी भावना व्यक्त केली होती.

Sharad Pawar : काँग्रेसला नकार, ठाकरे-मनसेसोबत युतीचे संकेत !

याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक विचार करून निर्णय घेतला. पक्षविरोधात अपक्ष लढलेल्या निष्ठावंतांबाबतची कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात संधी देण्याचा निर्णय अधिकृत करण्यात आला आहे.

अनेक वर्षापासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला, अनेक वर्ष भाजपासाठी संघर्ष करणारा चंद्रपूर येथील हाडाचा कार्यकर्ता ब्रीजभूषण पाझारे यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले. यानंतर राज्यातील इतर निष्ठावंतांनाही परत पक्षात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

maveja scam : 73 कोटींच्या घोटाळ्याने महसूल विभागात खळबळ

 

कारवाईतून मुक्त झालेली प्रमुख नावे आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तपशील बडनेरा तुषार भारतीय निलंबन आणि हकालपट्टी,चंद्रपूर ब्रीजभूषण पाझारे पक्षातून निष्कासन, शिरूरचे माणिकराव जगताप निलंबन, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, शिवाजी भोळे निलंबन, सोलापूर ग्रामीण संदीप गायकवाड निलंबन, घाटकोपर मधुकर चव्हाण प्राथमिक सदस्यत्व रद्द.

Mumbai BMC Elections : भाजपनंतर उद्धव सेनेचा डाव; संयुक्त खेळीने शिंदे सेनेला धोबी पछाड !

या निर्णयानंतर भाजपमध्ये “निष्ठावंतांना पुन्हा सन्मान मिळाला” अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. निष्ठावंतांची नाराजी शांत करणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे वरिष्ठ नेतृत्वाने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपमध्ये उपर्यांची एंट्री, निष्ठावंतांची नाराजी आणि आता झालेला समेट या साऱ्या घडामोडींचा राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.