Maharashtra politics : ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने !

Dragon sitting in the house BJPs counterattack on Uddhav Thackeray : ‘घरात बसलेले अजगर’; उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार,

Mumbai: महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात पुन्हा शब्दांच्या वारांचा भडिमार सुरु झाला आहे. वरळी डोममध्ये पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अमित शाह यांना ‘ॲनाकोंडा’ असा अप्रत्यक्ष उल्लेख करत भाषणात आग ओकली.

उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर भाजपकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना त्यांना ‘घरात बसलेले अजगर’ असे संबोधले आहे.

Vidarbha Farmers : कापूस स्लॉट बुकिंग किचकट; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे. “उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर आहेत, जे फक्त पडून राहतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांनाही गिळलं,” अशा तीव्र शब्दांत बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

बावनकुळे यांनी पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. निराशेच्या गर्तेत त्यांनी गरळ ओकली आहे. “इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे आरशात बघावेत, कारण ते स्वतः घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात आणि इतरांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित शाह यांचं कौतुकही केलं. “अमितभाई शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, आणि कलम ३७० रद्द करून इतिहास रचतात. पण उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदीजी आणि अमितभाई यांच्यावर टीका करण्याचाच उद्योग करतात,” असा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Government : ६००० रुपये द्या, एसीमध्ये चहा-कॉफी प्या!

बावनकुळे यांनी पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. “तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव अटळ असल्याचं उद्धव ठाकरेंना ठाऊक आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी ते विवेकभ्रष्ट टीका करत आहेत. त्यांच्या या विकृत राजकारणाला आता त्यांचे स्वतःचे कार्यकर्तेही कंटाळले आहेत,” असे बावनकुळे म्हणाले.

या शाब्दिक संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील हा नवीन वाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.