Eknath Shinde should now knock on Amit Shah’s door : बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लाऊन बसावे लागणार !
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची काल (२० मे) मंत्रीमंडळा वर्णी लागली. धनंजय मुंडे यांचे खाते त्यांना देण्यात आले. भुजबळांच्या मंत्रीमंडळातील समावेशाने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत, प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेचे (उबाठा) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांचा काल छोटेखानी समारंभात झालेला शपथ विधी आणि एकदरीतच राज्यातील राजकीय घडामोडींवर सामनातून प्रहार करण्यात आला आहे. ‘फडणवीस आणि शिंदे यांना छगन भुजबळ कसेच चालत नव्हते. कारण भुजबळ सत्तेत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अटक केली होती. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवायचा आहे, असे सांगून एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि आता त्यांना छगन भुजबळांच्याच मांडीला मांडी लाऊन बसावे लागणार आहे’, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? असे प्रश्न एकनाथ मिंधे उद्धव ठाकरेंना विचारत होते. त्यांनी शिवसेना सोडून अमित शाह यांचे नेतृत्व स्वीकारले. तेव्हा त्यांनी जी कारणे दिली होती, त्यामध्ये भुजबळांच्या मांडीला मांडी लाऊन बसणार नाही, हेसुद्धा एक मुख्य कारण होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नाही, असे मिंधेंनी तेव्हा सांगितले होते.
Scheme For Farmers : मुनगंटीवार म्हणाले, अॅग्रीस्टॅकचे लाभ मिळवा, ‘फार्मर आयडी’ बनवा !
अमित शाह आणि फडणवीसांनी मिंधेंची कोंडी केली की आणखी कुणी? शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला. भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिंदे-मिंधे यांनी हजेरी तर लावलीच. पण शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश हा मिंधे आणि त्यांच्या लोकांना इशारा आहे’, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.