Maharashtra politics : अजितदादांवर पुन्हा बोललात तर जीभ हासडू !

NCP MLAs direct warning to Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या आमदाराचा संजय राऊतांना थेट इशारा

Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत “ते मूर्ख राजकारणी आहेत, अर्धे पाकिस्तानी आहेत, ते पाकड्या आहेत” अशा शब्दांत केलेल्या संजय राऊतांच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे. “अजितदादांवर पुन्हा बोलाल तर जीभ हासडू, आणि त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल,” असा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

नायकवाडी म्हणाले, “ज्यांना सगळेजण भोंगा म्हणतात ते दररोज सकाळी नऊ वाजता वाजतात. काही दिवस त्यांचा आवाज बंद झाला होता, पण आता परत सुरू झाला. राऊत फार खालच्या पातळीवर जाऊन अजित पवारांवर टीका केली. अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकणारे, मुख्यमंत्रीपद पेलण्याची क्षमता असलेले नेते आहेत असं काही दिवसांपूर्वी राऊत स्वतः म्हणाले होते. आणि तेच राऊत नंतर घाणेरडी भाषा वापरतात. ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्र विसरणार नाही.”

Local Body Elections : काँग्रेसचा पारंपरिक गड, भाजपची वाढती ताकद

 

पुढे नायकवाडी म्हणाले, “नेत्याच्या अंगात अमुक अमुक रक्त आहे असं बोलणं म्हणजे अत्यंत अशोभनीय आहे. संजय राऊत यांनी स्वतःच्याच डीएनएची तपासणी करून घ्यावी. कारण आम्हालाही काही रिपोर्ट्स मिळाले आहेत, पण आम्ही संयम बाळगतो. अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. मग पाकिस्तानशी जोडून आमच्या नेत्याबद्दल बोलणं हे लाजिरवाणं आहे. हा प्रकार जर राऊतांनी थांबवला नाही तर आमचे कार्यकर्ते त्यांची जीभ हासडतील.”

Khadakpurna Dam : खडकपूर्णा ‘ओव्हर फ्लो’; १९ दरवाजे उघडले!

“जर अजितदादांबद्दल अजून एक शब्द जरी काढलात तर तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्राचा राजकारणात विचारांची लढाई असावी, पण व्यक्तीश: घाणेरडी भाषा वापरणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे. अजित पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.”

State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !

दरम्यान, संजय राऊतांनी भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावर “अर्धे पाकिस्तानी” असा हल्ला केला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट असून, पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. या वादामुळे राज्याच्या राजकारण चांगलंच तापलं आहे.

____