Maharashtra politics : “दोन नंबरला काही किंमत नसते”

Ravindra Chavan teased Eknath Shinde! : रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एक धडाकेबाज विधान केले आहे. “दोन नंबरला काही किंमत नसते” असे म्हणत त्यांनी थेट टोला लगावला असून त्यांच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्देशून बुचकळ्यात टाकणारा संदेश देण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

नुकतेच त्यांनी “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे” असे सांगून गदारोळ निर्माण केला होता. या विधानामुळे महायुतीच्या घरात वादाचे सावट निर्माण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते; आणि आता नव्या विधानामुळे परत एकदा वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Ballarpur Municipal Elections : बल्लारपूरमध्ये ‘कमळ’ लहर, मतदानापूर्वीच जिंकली लढाई!

विटा नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सांगली जिल्ह्यातील माजी उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते आर. आर. पाटील यांच्या विधानसभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाची आठवण करून दिली. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यानंतर आबांनी विधानसभेत केलेल्या भाषणात “मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण नंबर दोनच राहिलो. नंबर एक हा नंबर एकच असतो, नंबर दोन याला काही किंमत नसते” असे विधान केले होते. रवींद्र चव्हाण यांनी याच ओळींचा उल्लेख करत “हे माझे वाक्य नाही, आबांचे आहे… परंतु निदान आबांच्या भाषणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. दोन नंबरला काही किंमत नसते. जो काही आहे देवाभाऊ ही आहे” असे म्हणत शिवसेनेवर आणखी एक सूचक पण झणझणीत निशाणा साधल्याचे चित्र निर्माण झाले.

Bjp mul : मुलमध्ये ‘कमळ’ आघाडीवर,मुनगंटीवारांच्या विकासकामांची जादू !

राज्यातील कोकणासह अनेक भागांत शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपवर निवडणुकीत पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपमध्ये गेले असल्याने शिंदे सेना अस्वस्थ व आक्रमक झाली आहे. या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे दिल्लीत गाठ घालत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. यामुळे महायुतीत तणाव असल्याच्या चर्चांना अधिक हवा मिळाली.

Tapovan tree cutting : दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही म्हटलं, तर उत्तर द्यावंच लागतं

पालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पूर्वसंध्येला शिंदे सेना व भाजप यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने स्पष्ट केले आहे की अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत नसून महायुतीच आतून फुटण्याच्या स्थितीत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे “२ डिसेंबर रोजी मतदानानंतर निकाल येण्याआधीच राजकीय वादळ येणार का?” या प्रश्नाभोवती राज्याचे राजकारण फिरू लागले आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या सलग दोन स्फोटक विधानांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि शिंदे सेनेतील अविश्वास, नाराजी आणि छुपा संघर्ष खुलेपणाने समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून महायुतीत खरोखरच ‘महा’ खिंडार पडत आहे का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

____