व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ballarpur Municipal Elections : बल्लारपूरमध्ये ‘कमळ’ लहर, मतदानापूर्वीच जिंकली लढाई!

Ballarpur Municipal Elections : बल्लारपूरमध्ये ‘कमळ’ लहर, मतदानापूर्वीच जिंकली लढाई!

Effective development of Mungantiwar eases path of victory for candidates : मुनगंटीवारांच्या प्रभावी विकासामुळे उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर

Chandrapur: बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत झालेल्या सर्वांगीण विकासाच्या कामांच्या आधारे भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेणुकाताई दुधे आणि नगरसेवकांच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र राजकीय पातळीवर स्पष्ट होत आहे. शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम, शिक्षण, क्रीडा आणि न्यायव्यवस्था या सर्व क्षेत्रांत झालेल्या ठोस कामांची प्रभावी नोंद मतदारांच्या मनात निर्माण झाल्यामुळे या निवडणुकीची दिशा “विकास” या मुद्द्यावर केंद्रित झाल्याचे दिसून येते.

बल्लारपूरमध्ये नुकतेच ₹३६ कोटी ७० लाखांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन पार पडले. यापूर्वी आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन, रस्त्यांची पायाभूत सुधारणा आणि शहर विकासाशी निगडित अनेक प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पांमुळे शहरातील विकासकामांचा वेग आणि व्याप्ती दोन्ही लक्षणीयरीत्या वाढल्याचे दाखले निवडणूक चर्चांमध्ये ठळकपणे दिसत आहेत.

Bjp mul : मुलमध्ये ‘कमळ’ आघाडीवर,मुनगंटीवारांच्या विकासकामांची जादू !

नगराध्यक्ष पदासाठी रेणुकाताई दुधे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित बैठकीत माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी “केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर भाजपची सत्ता असल्यामुळे निधी उपलब्धता, प्रशासकीय समन्वय आणि निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे. बल्लारपूरचा सर्वांगीण विकास अधिक परिणामकारकपणे पुढे न्यायचा आमचा दृढ संकल्प आहे,” असे मत व्यक्त केले. भविष्यातील विकासकामांची मालिका यापुढेही गतीने सुरू राहील, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हे ध्येय कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : उशिराने उमजले वास्तव , चंद्रपूरचे खासदार म्हणून मुनगंटीवारांचीच गरज होती!

भाजपाच्या प्रचार प्रक्रियेत आमदार मुनगंटीवार यांची उपस्थिती, नियोजन आणि दिशा यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम आहे. रेणुकाताई दुधे यांच्या प्रचार मोहिमेत ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि शहराध्यक्ष रणंजय सिंह यांनीही प्रभावी आघाडी घेतली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने प्रचार प्रक्रियेत सक्रिय दिसत असल्याने निवडणुकीतील विजयाचा आत्मविश्वास अधोरेखित होत आहे.

नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधील भाजप उमेदवारांचा एकाच मुद्द्यावर केंद्रित आहे तो म्हणजे “विकासाला मत द्या, बल्लारपूरचा प्रगतीचा वेग कायम ठेवा.” प्रचार संदेशाचा पाया हा प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या विकासकामांवर आधारित असल्यामुळे सर्वसामान्य मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळल्याचे निरीक्षण राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !

बल्लारपूर शहरात सुरू असलेल्या विकासाचा वेग, भविष्यातील नियोजित प्रकल्पांचा व्यापक आराखडा आणि आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर असलेला जनविश्वास पाहता, या निवडणुकीत जवळपास भाजपचा विजय निश्चित झाला आहे. मतदारसंघात दिसणारे वातावरण हे “विकासाच्या पाठीशी जनतेचे ठाम समर्थन” या दिशेने झुकल्याचे संकेत देत असून, विजयाचा मार्ग भाजपा आणि रेणुकाताई दुधे यांच्या बाजूने स्पष्टपणे मोकळा झाल्याचे राजकीय संकेत उमटत आहेत.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि गोंधळाचा वातावरण कायम असून, सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर दिसत आहे. संघटनात्मक विस्कळीतपणा आणि दिशाहीन धोरणांमुळे काँग्रेसची स्थिती अधिक दयनीय झाली आहे. या परिस्थितीचा थेट राजकीय फायदा भारतीय जनता पार्टीला मिळत असून, जनतेचा कल स्पष्टपणे भाजपाच्या समर्थनाकडे वळताना दिसत आहे.

___

error: Content is protected !!