sangli-politics-suhas-babar-warning-to-bjp-leaders-shinde-shivsena : शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा
Mumbai: सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचताच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये परस्परांवर जोरदार टीकेचे सत्र सुरू झाले असून, याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना जाहीर सभेतून गर्भित इशारा दिला आहे.
खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी गावात आयोजित प्रचार सभेत बोलताना आमदार सुहास बाबर यांनी थेट आणि आक्रमक भाषेत भूमिका मांडली. माझ्यासारखे २४२ आमदार आहेत, म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे. एकदा मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा, सुहास बाबर कोण आहे ते. याचं उत्तर मुख्यमंत्री स्वतः देतील,” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना बाबर यांनी हे वक्तव्य केले.
Baramati Press Conference : विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, शरद पवारांचा पलटवार
खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार टशन पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी सुहास बाबर यांच्यावर टीका केली होती. या टीकेमुळेच शिंदे गटाच्या आमदाराने आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आहे.
आपल्या राजकीय प्रभावाबाबत बोलताना सुहास बाबर म्हणाले की, “मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो तर काय होतं ते अनेकांना माहीत आहे. खानापूर-आटपाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप सगळ्यांशी काम करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे.” विटा परिसरात आपण काय केलं आहे, हे जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावाही त्यांनी केला.
BMC Mayor Election : मुंबईच्या महापौरपदी राहुल नार्वेकरांच्या नातेवाईक? भाजपमध्ये धुसफूस!
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगली जिल्ह्यात प्रचाराचा जोर वाढवला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाळवा तालुक्यात जाहीर सभा घेतली. या सभेत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
https://sattavedh.com/mayoral-election-mahayuti-wins-mayor-elections-in-thane-kalyan-and-ulhasnagar-unoppose
“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत,” असा स्पष्ट संदेश देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. सांगली जिल्ह्यातील ही राजकीय चुरस दिवसेंदिवस वाढत असून, भाजप आणि शिंदेसेनेतील हे उघड मतभेद निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








