Mahavikas Aghadi : जनसुरक्षा विधेयक मागे घ्या; अन्यथा लढा सुरूच राहणार

Demand to withdraw the Public Safety Bill : राजेश मापारींचा इशारा, लोणारमध्ये महाविकास आघाडी आक्रमक

Lonar राज्य शासनाच्या जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी लोणार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपला तीव्र विरोध नोंदविला. विरोधकांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की विधेयक मागे न घेतल्यास आपली लढाई अखंड सुरू राहील.

कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश मापारी यांनी सरकारवर कटू टीका करत म्हणाले, “हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागल्याप्रमाणे आता जनसुरक्षा विधेयकही लोकांच्या दबावाखाली मागे घ्यावे लागेल. हे विधेयक लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्याचे आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचे प्रयत्न आहे. जोपर्यंत विधेयक मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील.”

Illegal sand mining : ऐकावे ते नवलच, रेतिमाफियांची सरकारवर ड्रोनद्वारे नजर!

आंदोलनात मविआतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश धुमाळ, ज्ञानेश्वर मामा चिभडे, प्रदीप संचेती, नितीन शिंदे, शेख करामत, विकास मोरे, शेख समद, अश्रूजी फुके, शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख गजानन जाधव, बाजार समितीचे संचालक विजय मोरे, तानाजी मापारी आदी उपस्थित होते. सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून “जनसुरक्षा विधेयक रद्द करा”, “लोकशाहीवर गदा आणू देणार नाही” अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून टाकला.

आंदोलनाच्या शेवटी तिथल्या नेत्यांनी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त केले आहे. निवेदनात तातडीने जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्य सरकारने अलीकडेच हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढल्याचा उल्लेख या आंदोलनात करण्यात आला. विरोधकांचे असे म्हणणे आहे की जर सरकारने जनसुरक्षा विधेयकावरील धोरण कायम ठेवले तर ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनात्मक प्रतिसादाला सामोरे जाईल.

Reservation controversy : सरसकट कुणालाही आरक्षण दिलेले नाही

आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे स्पष्ट संदेश दिला की राज्यातील लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी त्यांचा संघर्ष सातत्याने चालू राहील.