Fadnavis Shinde Pawar meeting : फडणवीस, शिंदे, पवार बैठक
Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दीड तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत महायुतीतील समन्वय, आगामी निवडणुका आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. महायुतीत समन्वयाचा अभाव जाणवत असल्याने पुढील काळात मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचे ठरले. मंत्री व आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आरोपांमुळे निर्माण होणारे वाद टाळून महायुती मजबूत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा करताना शक्य तिथे महायुती करण्याचा प्रयत्न व्हावा, अशी भूमिका मांडण्यात आली. महायुती शक्य नसेल आणि त्यामुळे विरोधकांना फायदा होणार असेल तर तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच निवडणुकांपूर्वी विविध महामंडळांवरील नियुक्त्या पूर्ण करण्याची मागणी शिंदे आणि पवार यांनी केली.
Tractor Pola : मेहकरात शिंदे सेना-उद्धव सेनेचे ‘ट्रॅक्टर’ आमने-सामने!
मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावरही चर्चा झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन कसे हाताळावे याबाबत विशेष रणनीती आखण्यात आल्याचे समजते.
याच वेळी उपराष्ट्रपती निवडणुकीचा विषयही चर्चेत आला. एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन मिळावे यासाठी फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र राधाकृष्णन यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांना पाठिंबा देणे शक्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनीदेखील विरोधकांच्या भूमिकेनुसार निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
Jayant Patil : निवडणूक आयोगाला सरळ करण्यासाठी फडणवीसांनी आमच्या सोबत यावं !
दरम्यान, राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने औपचारिकता म्हणून आपण दोन्ही नेत्यांना पाठिंब्याबाबत विनंती केली होती, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
____








