व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Malkapur municipal council : नगरपरिषद ‘अकार्यक्षम’; प्रहारकडून घागर पुजून श्राद्ध आंदोलन

Malkapur municipal council : नगरपरिषद ‘अकार्यक्षम’; प्रहारकडून घागर पुजून श्राद्ध आंदोलन

Prahar workers protested against malkapur municipal council : चार महिन्यांतच प्रशासनावर रोष; प्रहारचा इशारा – आता तीव्र आंदोलन

Malkapur प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पालिका प्रशासन मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत नगरपरिषद कार्यालयात घागर पुजून ‘श्राद्ध’ घालत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी थेट नगरपरिषदेला लक्ष्य केले. नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येऊन चार महिने उलटूनही शहरातील मूलभूत प्रश्न कायम असल्याचा आरोप करण्यात आला. विशेषतः साफसफाईचा अभाव, खराब रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना १५-१५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

Nagpur Municipal corporation : गोरेवाडा पाण्यावरून काँग्रेस आक्रमक; आज महापालिकेचा ‘ऑन द स्पॉट’ दौरा.

नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरात अस्वच्छता असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दिव्यांग बांधवांसाठी राखीव ५ टक्के निधी वेळेत वितरित होत नसल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याशिवाय साफसफाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन ते अडीच महिन्यांपासून पगार थकले असल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला.

आंदोलनादरम्यान काही अधिकारी व कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी टाळून रजिस्टरमध्ये नोंद करत असल्याचा आरोप करण्यात आला. निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये भ्रमनिरास वाढत असल्याचे प्रहारने स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाविरोधातील असंतोष आता संघटित आंदोलनाच्या रूपात समोर येऊ लागला आहे.

PWD : निधी मंजूर, तरी काम ठप्प; मलकापूर-बुलढाणा मार्ग अडकला राजकारणात

या पार्श्वभूमीवर, एक महिन्याच्या आत शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत न केल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारने दिला आहे. या आंदोलनात शहराध्यक्ष शालीकराम पाटील, तालुकाध्यक्ष राहुल तायडे, बलराम बावस्कर, दिव्यांग संघटनेचे निलेश चोपडे, नागेश सुरंगे, अनिल गोठी, संजय इंगळे, करण नायसे, राजू पुणेकर यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

error: Content is protected !!