व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur Municipal corporation : गोरेवाडा पाण्यावरून काँग्रेस आक्रमक; आज महापालिकेचा ‘ऑन द...

Nagpur Municipal corporation : गोरेवाडा पाण्यावरून काँग्रेस आक्रमक; आज महापालिकेचा ‘ऑन द स्पॉट’ दौरा.

nagpur municipal corporation administration will visit gorewada water supply plant : नाल्याचे घाण पाणी सोडल्याचा काँग्रेसचा दावा, प्रशासनाला आली जाग

Nagpur नागपूर महानगरपालिकेत तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर भाजपची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली असली, तरी पहिल्याच दिवसापासून शहराचा पाणी प्रश्न चांगलाच तापला आहे. महापालिकेत विरोधकांची संख्या अपुरी असली, तरी काँग्रेसने पहिल्या दिवसापासूनच अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या गोरेवाडा तलावातून नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्यात नाल्याचे घाण पाणी सोडले जात असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत केला.

या गंभीर आरोपानंतर आता सत्ताधारी भाजपलाही बचावात्मक पवित्रा सोडून गोरेवाडा प्रकल्पाची दखल घ्यावी लागली आहे. विशेष म्हणजे, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा करणाऱ्या ‘ओसीडब्ल्यू’ (OCW) कंपनीच्या विरोधात सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्यांवर एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Manoj Kayande : मनोज कायंदेच्या बारामती दौऱ्यामागे राजकीय स्ट्रॅटेजी?

महापालिकेच्या पहिल्याच सभेत महापौर नीता ठाकरे यांनी प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढत ओसीडब्ल्यू कंपनीला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागील १२ वर्षांपासून शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र ते गाठण्यात कंपनीला साफ अपयश आले आहे.

ज्या लक्ष्मीनगर झोनमधून या पायलट प्रोजेक्टची सुरुवात झाली होती, त्या भागातही अद्याप चोवीस तास पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शुद्ध पाणीपुरवठा, पाण्याची गळती थांबवणे आणि चोरी रोखण्यासाठी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या, मात्र त्यानंतरही अनेक भागांत अशुद्ध पाणी येत असून गळतीचा प्रश्न कायम आहे.

PM Awas Yojna : ९८ हजार घरकुले अपूर्ण; ‘घरकुल’ स्वप्न अजूनही अधांतरी

 

प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक ग्राहकांना कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वाढीव देयके पाठवण्यात आली होती. ही देयके चुकीची असल्याचे सिद्ध होऊनही कंपनीने ती मागे न घेतल्याने भाजप आमदारांसह नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कंपनीला कडक शब्दांत तंबी दिली होती, मात्र आता नगरसेवक सभागृहात परतल्याने हा विरोध अधिक तीव्र झाला आहे.

Devendra fadnavis : विरोधकांनी लोकशाही मारली, 70 कोटी महिलांचा विश्वासघात !

काँग्रेसने केलेल्या गोरेवाडा तलावातील प्रदूषणाच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना अधिकाऱ्यांनी नाल्याचे पाणी मिसळत असल्याची कबुली दिली, मात्र हे पाणी थेट शहराला पुरवले जात नसल्याचा दावा केला. पेंच प्रकल्पातून पाईपने पाणी आणून ते जलशुद्धीकरण केंद्राद्वारे वितरित केले जाते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आज महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा संयुक्त दौरा गोरेवाडा येथे आयोजित करण्यात आला असून, या पाहणीनंतर ओसीडब्ल्यू कंपनीवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!