व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj Jarange : मनोज जरांगेंचा गनिमी कावा; ‘मुंबई चला’च्या आदेशाने महायुतीचे टेन्शन...

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा गनिमी कावा; ‘मुंबई चला’च्या आदेशाने महायुतीचे टेन्शन वाढले!

Manoj Jarange’s ‘Mumbai Chalo’ call increases tension within the Mahayuti : आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे सेनाही कोंडीत

Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला असून, त्यांनी महायुती सरकारची झोप उडवणारा नवा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना थेट मुंबईच्या दिशेने रवाना व्हा असा एल्गार पुकारत, गनिमी काव्याने मुंबईत दाखल होण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

यापूर्वी जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई पूर्णपणे जाम झाली होती; त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई ठप्प’ होण्याच्या भीतीने सत्ताधारी आणि प्रशासनाने मोठी धास्ती घेतली आहे.

विशेषतः जरांगेंच्या या पवित्र्यामुळे शिंदे सेना पूर्णपणे कोंडीत सापडली आहे. जरांगे यांनी थेट आव्हान देत म्हटले आहे की, ५६ लाख कुणबी नोंदी रद्द केल्या आहेत की नाही, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे द्यावे.

Vanchit bahujan aghadi rajendra patode : लाडकी बहीण योजनेसाठी SC, ST निधी वळविला, वंचितचा आरोप

दरम्यान, राज्य सरकारमधील नेत्यांकडून हे वादळ शमवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांनी महायुतीची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. आम्ही मराठा आरक्षणावर गांभीर्याने काम करत आहोत. मनोज जरांगे यांच्या मनात महायुतीबाबत जे काही गैरसमज निर्माण झाले आहेत, ते संवादाच्या माध्यमातून लवकरात लवकर दूर करू, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.

Arvind Sawant : इमारत देखणी असून चालत नाही, आरोग्य सेवा महत्त्वाची; अरविंद सावंतांचा सरकारला टोला

तर दुसरीकडे, आजवर मराठा आरक्षणासाठी जेवढे काम महायुती सरकारने केले, तेवढे इतर कोणीही केले नाही, असा दावा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केला आहे.

सत्ताधाऱ्यांचे हे दावे जरांगे पाटलांचा संताप शांत करण्यात यशस्वी ठरतात की मराठ्यांचे वादळ पुन्हा मुंबईच्या वेशीवर धडकते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!