Congress leaders claim that party workers continue to stand with the Congress despite the party being out of power : भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही, बबलू देशमुखांनी साधला निशाणा
Amravati भाजपकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना आणि राजकीय भूलथापांना जनता यापुढे बळी पडणार नाही, असा दावा अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांनी केला. सत्ता आणि पद नसतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता डगमगलेला नाही. तो आजही प्रामाणिकपणे पक्षासोबत उभा आहे, असा दावा करत देशमुख यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचा मुद्दा अधोरेखित केला.
चांदूर बाजार शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने माधान रोडवरील रघुवंशी मंगल कार्यालयात बबलू देशमुख यांच्या अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे अध्यक्षस्थानी होते.
Sadabhau Khot : ‘बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, आपण फक्त बघत बसलो’
काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती; शक्तिप्रदर्शनाची चर्चा
बबलू देशमुख यांच्या सत्कारासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
यावेळी देशमुख यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत जनतेचा भ्रमनिरास होत असल्याचा दावा केला. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता काँग्रेस कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेसोबत कायम असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता नसतानाही कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याचा उल्लेख करत त्यांनी पक्षसंघटनेच्या बळावर आगामी राजकीय लढतीसाठी तयार असल्याचे संकेत दिले.
‘पद नसतानाही गर्दी हीच कामाची पावती’
खासदार बळवंत वानखडे यांनी अध्यक्षीय भाषणात बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. कोणतेही पद किंवा सत्ता नसतानाही त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला झालेली मोठी गर्दी ही त्यांच्या जनसंपर्काची आणि कार्याची पावती असल्याचे वानखडे म्हणाले.
Maharashtra Rain : कुठे पावसाचा रुसवा, कुठे मुसळधार कहर! निम्मा महाराष्ट्र तहानलेला
बबलू देशमुख हे सातत्याने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत असून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करतात. त्यामुळेच कार्यकर्त्यांची त्यांच्यावरील निष्ठा कायम असल्याचे वानखडे यांनी सांगितले.








