व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mansar Grampanchayat :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल

Mansar Grampanchayat :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल

Gram Panchayat employees’ liquor party in public program : समाजभवनातच माहोल, निलंबित करून दोघांची उतरवली ‘झिंग’

Nagpur राजकारण्यांची हाती सत्ता असली की ते माजतात आणि प्रशासनाच्या हाती सत्ता दिली की तेही पुरेपूर दुरुपयोग करतात. याची प्रचिती देणारी घटना रामटेक तालुक्यातील मनसरमध्ये आली. मनसर ग्रामपंचायतच्या दोन कर्मचाऱ्यांनी समाजभवनातील सार्वजनिक कार्यक्रमातच दारू पार्टी केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर दोघांना निलंबित करून त्यांची झिंग उतरवण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी एकीकडे राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे तेथील कर्मचाऱ्यांची मनमानी मात्र वाढत असल्याचे चित्र आहे. मनसरच्या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी समाजभवनातील सार्वजनिक कार्यक्रमात दारू पार्टी केल्याने दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

Harshawardhan Sapkal : मोदींचं चक्र उलट्या दिशेनं फिरतंय!

रामटेक तालुक्यातील मनसर ग्रामपंचायतीचे वसुली लिपिक हेमराज केशवराव चिंचुलकर आणि कर्मचारी परसराम उपरे अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दारू प्यायल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दोघांवर ही कारवाई करण्यात आली. दारू पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. संबंधित व्हिडिओ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांच्याकडे पाठवून तक्रार दाखल करण्यात आली.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पोहोचणार बच्चू कडूंच्या आंदोलनात!

यानंतर त्यांनी रामटेक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीत दारू पार्टीत चिंचुलकर आणि उपरे यांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ग्रामपंचायत अधिकारी मुकुंदा मरसकोल्हे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ६१ नुसार दोघांनाही निलंबित केल्याचे आदेश जारी करण्यात आले.

Local Body Elections : ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका!

सरकारी कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारे सरकारी इमारतीत मद्यपान करणे म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे कृत्य आहे. शासनाचे नियम, नैतिकता आणि शिस्त यांची पायमल्ली करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

error: Content is protected !!