Tension in alliance over Mumbai Municipal Corporation mayoral post : मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून युतीत तणाव
Mumbai: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक महापालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निकालाकडे लागले होते. पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र येऊनही मतदारांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता महायुतीच्या हाती गेली असली, तरी आता महापौरपदावरून मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेचा महापौर भाजपाचाच होणार, अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट महापौरपदासाठी दावा केल्याने समीकरणे बदलली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाकडून भाजपकडे अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपकडे संपूर्ण पाच वर्षे महापौरपद ठेवण्याची भूमिका असल्याने युतीत मतभेद उघडपणे समोर येत आहेत.
Administrative Failure : बुलढाण्यात अतिक्रमणांचा विळखा कायम; २१ हजार नोटिसा पाठवूनही प्रशासन सुस्त!
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. शिवसेनेचे सर्व २९ नगरसेवक सध्या मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी असून, पुढील तीन दिवस तेथेच राहणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून नगरसेवक फोडले जाऊ नयेत, यासाठी शिंदे गटाने सतर्कतेची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
ताज लँड्स एंड येथे शिवसेनेच्या सर्व २९ नगरसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवसेनेचे अनुभवी नेते नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. महापालिका सभागृहात कशा पद्धतीने काम करायचे, कोणते मुद्दे मांडायचे, तसेच महायुतीत शिवसेनेची भूमिका काय असणार, याबाबत सविस्तर सूचना दिल्या जाणार आहेत.
भाजपकडून मुंबई महापालिकेत पाच वर्षे महापौरपद आमचेच राहील, अशी ठाम भूमिका घेतली जात आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट याला विरोध करत असून, अडीच-अडीच वर्ष महापौरपद भाजप आणि शिवसेनेत वाटून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या २९ नगरसेवकांनी भाजपची एकहाती साथ देऊ नये, यासाठी शिवसेना अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Prataprao Jadhav : सत्तेसाठी वेगळे, सत्तेसाठीच एकत्र, पण जनतेने नाकारले
मुंबई महापालिकेत भाजपाचे ८९ तर शिवसेना शिंदे गटाचे २९ नगरसेवक निवडून आले असून, हा महायुतीसाठी मोठा विजय मानला जात आहे. पहिल्यांदाच भाजपाचा महापौर मुंबई महापालिकेवर विराजमान होणार, अशी चर्चा असतानाच शिंदे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. आता भाजप एकनाथ शिंदेंची अडीच-अडीच वर्षांची मागणी मान्य करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








