Breaking

Minister Indraneel Naik : आदिवासी मुलींच्या शिक्षणातून नवा विकास!

If tribal girls get good education, the state will also develop : राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सन्मान

Yavatmal आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेऊन उच्चपदावर नियुक्त होत आहेत. ही अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. या मुलींमध्ये वेगळ्या क्षमता आहेत. त्यांच्या क्षमतांचा राज्याला नव्या विकासाच्या दिशेने वाटचाल करता येईल, असा विश्वास आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला.

आदिवासी बचत गट व वैयत्तिक वनहक्कधारक लाभार्थ्यांचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसिलदार महादेव जोरवर, गटविकास अधिकारी संजय राठोड, एड. सुनिल ढाले आदींची उपस्थिती होती.

Umara Grampanchayat : आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंड!

या समाजातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलींना देखील चांगले शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज आहे, असेही नाईक म्हणाले. पुसद प्रकल्पामध्ये विविध विकास योजना व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची कामे यशस्वीरीत्या पार पाडत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

येत्या पाच वर्षांमध्ये कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांचे इमारत बांधकाम पुर्णत्वास जाईल याची ग्वाही दिली. पुसद शहरामध्ये क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील मुली शिक्षण घेवुन उच्चपदावर नियुक्त होत असल्याबाबत आभिमान व आनंद व्यक्त केला.

Ravikant Tupkar : सुडबुध्दीच्या राजकारणातून शेतकरी चळवळीवर आघात ?

100 दिवस कृती कार्यक्रम तसेच प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक व विकास विषयक विविध योजना, सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, वनपट्टेधारकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, न्युक्लीअस बजेट, शबरी आदिवासी घरकुल, स्वाभीमान सबळीकरण योजना, पारधी विकास योजना, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान योजना, धरतीआबा जनजाती उन्नतग्राम अभियान योजनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.