Parents are laborers; two brothers cleared MPSC : महसूल सहायक पदावर नियुक्ती; कुटुंबाचा आनंद गगनात मावेना
Arjuni Morgao आई-वडील मजुरू करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. पण दोन्ही मुलांमध्ये शिकण्याची जिद्द आहे. नव्हे तर घरची परिस्थिती बदलण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे. अशा एकूण वातावरणात दोन्ही सख्ख्या भावांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे दोघांचीही महसूल सहाय्यक पदावर निय्कुतीही झाली. त्यामुळे आई-वडिलांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे.
तालुक्यातील आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग असलेल्या झाशिनगर येथील चाकाटे कुटुंबातील दोन सख्या भावांनी एकाचवेळी महसूल सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ११ फेब्रुवारी २०२५ ला जाहीर झालेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल चाकाटे कुटुबिंयाकरीता आनंदाचा क्षण ठरला. अल्पभूधारक गोपाल धनीराम चाकाटे यांच्या मुकेश आणि संदीप या दोन्ही मुलांची एकाच वेळी महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे.
Board Exam : वडिलांच्या मृतदेहाला नमस्कार करून मुलगा गेला दहावीच्या पेपरला!
मुकेश आणि संदीप दोघांनीही झाशिनगर येथेच पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडील धनीराम ७ वा वर्ग शिकलेले आहेत. दोघांनीही मिळेल ते काम करून, मजुरी करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिक्षण दिले. संदीपने बीएसडब्ल्यू तर मुकेशने बीएससी पूर्ण केले. अभ्यासिका केंद्र गाठले.
कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. त्यामुळे कुठलीही खाजगी शिकवणी लावणे शक्य नव्हते. अशात अर्जुनी मोरगाव येथे अभ्यास केंद्रात जाऊन त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा ही सर केली.
Siddharth Kharat, Sanjay Raimulkar : आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर!
एप्रिल २०२४ मध्ये कौशल्य चाचणी पास करत अखेर प्रलंबित असलेला निकाल दि. ११ फेब्रुवारी २०२५ जाहीर झाला. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर महसूल सहाय्यक पद मिळवले आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्याचवेळी आई-वडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.