Breaking

MSEB Mahavitaran : गावकरी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाच्या तयारीत

Villagers prepare to protest by climbing a mobile tower : सारोळा परिसरातील गावांमध्ये कायमस्वरूपी वायरमनची मागणी

Buldhana सारोळा मारोती, फरदापूर आणि सारोळा पीर या गावांमध्ये गेल्या १२ महिन्यांपासून कायमस्वरूपी वायरमन नियुक्त न केल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, २४ तासांत योग्य निर्णय न झाल्यास गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल, आझाद हिंद शेतकरी संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मोताळा येथील उपकार्यकारी अभियंत्यांना ५ जून रोजी निवेदन देण्यात आले.

Local Body Elections : महायुतीमध्ये स्थानिक निवडणुकांवरून संभ्रम कायम

निवेदनात म्हटले आहे की, मागील ११–१२ महिन्यांपासून संबंधित गावांमध्ये एकही स्थायी वायरमन उपलब्ध नाही. त्यामुळे विद्युत यंत्रणेत सातत्याने अडथळे निर्माण होत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि शेतकऱ्यांचे शेती कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वीज वितरण कंपनीचा कारभार विना वायरमन कसा सुरू आहे, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, केवळ आश्वासनाशिवाय कोणतीही ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विद्युतसेवा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने वायरमनची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘कर्जमाफीची घोषणा फडणविसांची, आमची नाही’

या निवेदनावर ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, उपसरपंच प्रदीप कुऱ्हाडे, मोहनराव पाटील, विठ्ठल ढकचवळे, भूपेश शेळके पाटील, मनोज व्यवहारे, सुशांत शेळके, कमलाकर व्यवहारे, पुरुषोत्तम व्यवहारे, संजय येंडोले, शेख अफसर, गोपाल शिप्पलकर, विजय ढकचवळे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या मागणीला स्थानिक राजकीय संदर्भ आहे. वीज वितरण व्यवस्थेतील ही दुर्लक्षी भूमिका स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अधिक गती घेण्याची शक्यता आहे.