MSRTC News : एसटीची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द !

 

Decision taken after suggestion of Deputy Chief Minister Shinde : उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनंतर निर्णय

Mumbai : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एमएसआरटीसी 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत लागू होणारी 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. मंगळवारी ही वाढ जाहीर झाली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी ती मागे घेण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थिती आणि सर्वसामान्यांवर होणारा ताण लक्षात घेऊन ही भाडेवाढ त्वरित रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला आदेश देत हा निर्णय अमलात आणला.

Sudhir Mungantiwar : आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चिमुकल्या वैष्णवीला मिळाले नवे जीवन

एसटी महामंडळाने महसूल वाढीसाठी दिवाळीच्या गर्दीच्या काळात भाडेवाढ लागू करण्याचे ठरवले होते. मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध झाला. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई वगळता इतर सर्व बसेसवर 10 टक्के वाढ लागू होणार होती, ज्यामुळे गावाकडील प्रवाशी आणि रातराणीने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना थेट फटका बसला असता.

New rules : नवा महिना, नवे नियम, आजपासून मोठे बदल लागू

दरम्यान, दिवाळीत लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात. खासगी वाहनांची संख्या वाढली असली तरीही एसटी प्रवास सुरक्षित मानला जातो. त्यामुळेच दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवाशांना दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

___