MSRTC : प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एसटी महामंडळाचा थेट संवाद

Pravasi Raja Din’ and ‘Kamgar Palak Din’ initiatives : ‘प्रवासी राजा दिन’ व ‘कामगार पालक दिन’ उपक्रमाची बुलढाण्यात अंमलबजावणी

Buldhana प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सूचनांचे आगार पातळीवरच जलदगतीने निराकरण व्हावे, तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागात दर महिन्याच्या बुधवारी ‘प्रवासी राजा दिन’ आणि ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘प्रवासी राजा दिन’, तर दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘कामगार पालक दिन’ आयोजित केला जाणार आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये तसेच महामंडळाचे कर्मचारी यांनी आपल्या समस्या, तक्रारी व सूचना लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन बुलढाणा विभागाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
प्रवासी राजा दिन दरम्यान बससेवा, वेळापत्रक, तिकीट दर, सुविधा, गैरसोयी यासंदर्भातील तक्रारी व सूचना स्वीकारून त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
तर कामगार पालक दिन मध्ये संघटना व कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडचणी, तक्रारी व प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ तोडगा काढण्यावर भर देण्यात येणार आहे.

Local Body Elections : उपाध्यक्ष-सभापतीपदांसाठी मोर्चेबांधणी; पाच नगर परिषदांत राजकीय हालचालींना वेग

बुलढाणा विभागातील आगारांमध्ये पुढील तारखांना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे –
• बुलढाणा आगार : २४ डिसेंबर
• चिखली आगार : ३१ डिसेंबर
• खामगाव आगार : ७ जानेवारी
• मेहकर आगार : १४ जानेवारी
• मलकापूर आगार : २१ जानेवारी
• जळगाव जामोद आगार : २८ जानेवारी
• शेगाव आगार : ४ फेब्रुवारी

Navneet Rana : ‘हिंदूंनीही तीन-चार मुले जन्माला घालावीत’

एसटी सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, जिल्ह्यातील प्रवासी व महामंडळ कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.